12 डिसेंबर : समलिंगी संबंध बेकायदेशीर ठरवणार्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर सर्व स्तरातून नाराजी व्यक्त होतेय. या निर्णयामुळे आपण निराश झाल्याचं काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी एक निवेदन प्रसिद्ध करून आपली नाराजी व्यक्त केलीय.
आता या प्रकरणाची संसद दखल घेईल आण देशातल्या प्रत्येक नागरिकाला त्याचं आयुष्य स्वतंत्रपणे जगण्याचा अधिकार मिळेल, अशी अपेक्षाही सोनियांनी व्यक्त केलीये.तर दुसरीकडे गे संबंधांना मान्यता मिळावी यासाठी सर्व पर्यायांचा विचार करणार असल्याचं कायदा मंत्री कपिल सिब्बल यांनी सांगितलंय.
तर सरकारने सुप्रीम कोर्टात दुरुस्ती याचिका दाखल करायला हवी, असं मत केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी व्यक्त केलंय. सुप्रीम कोर्टाचा निर्णय प्रतिगामी असून तो 1860च्या काळात घेऊन जाणारा आहे, अशी प्रतिक्रिया चिदंबरम यांनी दिली.