08 जून : राष्ट्रवादी काँग्रेसचा आज 15 वा वर्धापनदिन सोहळा साजरा होतोय. आजच्या सोहळ्यामध्ये शरद पवार एकला चलो रेचा नारा देण्याची शक्यता आहे असं सांगण्यात येतं आहे त्यामुळे सोहळ्याकडे राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचं लक्ष लागलं आहे. या सोहळ्यात मुख्यमंत्री पदाच्या उमेदवाराचं नावही जाहीर होण्याची शक्यताही वर्तवली जातं आहे.
10 जून 1999 ला राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेचं अधिवेशन पहिल्यांदा मुंबईतल्या षण्मुखानंद सभागृहामध्ये पार पडलं होतं. तिथंच पक्षाच्या स्थापनेची अधिकृत घोषणा शरद पवारांनी केली होती. आज पक्षाचा 15व्या वर्धापनदिन सोहळाही त्याच षण्मुखामनंद सभागृहात पार पडणार आहे. . लोकसभा निवडणुकीतल्या दारुण पराभवानंतर शरद पवार मुंबईतल्या राष्ट्रवादी भवनात ठाण मांडून बसले आहेत. जिल्हानिहाय पदाधिकार्यांच्या बैठका घेतायेत. एकप्रकारे प्रदेश राष्ट्रवादीची सर्व सूत्रं शरद पवारांनी आपल्या हातात घेतली आहेत. अशावेळी वर्धापनदिनाच्या व्यासपीठावरुन शरद पवार काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कार्यकर्त्यांनी जरी शरद पवारांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार करण्याची मागणी केली असली तरी ही मागणी शरद पवार स्वत: मान्य करणं अवघड आहे. पण शरद पवार आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचे संकेत पदाधिकार्यांना देतील असं मानलं जातं आहे. एवढंच नाही तर अजित पवारांसह पहिल्या फळीतल्या कुठल्याही नेत्याचा विचार मुख्यमंत्रीपदासाठी होऊ शकतो हे ही शरद पवार सूचित करण्याची शक्यता आहे. . +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++ बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]> |
---|
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++