मुंबई – 25 मार्च : तिथीनुसार आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. त्यानिमित्त मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, य़ुवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, मंत्री दिवाकर रावते यांच्या उपस्थितीत पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं.यावेळी शेकडो शिवसैनिकांनी ‘जय भवानी, जय शिवाजी’चा जयघोष करत विमानतळ परिसर दणाणून सोडला.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने विमानतळावर शिवशाहीचा थाट उभारण्यात आला आहे. छत्रपती शिवरायांच्या भव्य पुतळ्यासमोर गडकिल्ल्यांची प्रतिकृती, ढोलताशे, तुतार्या, मावळ्यांच्या वेशातील शिवसैनिक, पारंपरिक वेशातील महिला-पुरुष जमले आहे. त्यामुळे मुंबई विमानतळावर शिवजयंतीनिमित्त शिवशाही अवतरल्याचं चित्र आहे.
वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासमोर भारतीय कामगार सेनेच्या वतीने गडकिल्ल्यांची प्रतिकृती उभारण्यात आली. शिवसेना विभागप्रमुख ऍड. अनिल परब, भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष सूर्यकांत महाडिक, उपाध्यक्ष अजित साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा पार पाडला जाणार आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेज ला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv