JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / 'मत'परीक्षा संपली, आता लक्ष निकालाकडे !

'मत'परीक्षा संपली, आता लक्ष निकालाकडे !

15 ऑक्टोबर : विधानसभा निवडणुकीसाठीच मतदान आज शांततेत पार पडलं. 288 जागांसाठी 4 हजार 119 उमेदवारांची आज ‘मत’परीक्षा पार पडलीये. महाराष्ट्राच्या जनतेनं आपला कौल दिला असून उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये बंद झालंय. राज्यभरात आज एकूण 64 टक्के मतदान झालं. 2009 साली 60 टक्के मतदान झालं होतं यावेळी 4 टक्के जास्त मतदान झालंय. राज्याच्या राजधानी मुंबईमध्ये 53 टक्के मतदान झालं आहे. मुंबईत 2009 साली 50 टक्के मतदान झालं होतं यावेळी 3 टक्के जास्त मतदान झालंय.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

  maharashtra_elections2014  15 ऑक्टोबर : विधानसभा निवडणुकीसाठीच मतदान आज शांततेत पार पडलं. 288 जागांसाठी 4 हजार 119 उमेदवारांची आज ‘मत’परीक्षा पार पडलीये. महाराष्ट्राच्या जनतेनं आपला कौल दिला असून उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये बंद झालंय. राज्यभरात आज एकूण 64 टक्के मतदान झालं. 2009 साली 60 टक्के मतदान झालं होतं यावेळी 4 टक्के जास्त मतदान झालंय. राज्याच्या राजधानी मुंबईमध्ये 53 टक्के मतदान झालं आहे. मुंबईत 2009 साली 50 टक्के मतदान झालं होतं यावेळी 3 टक्के जास्त मतदान झालंय. आज सकाळी मतदानाला चांगली सुरुवात झाली मात्र त्यांनतर मताचा टक्का मंदावला होता. सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत मंतदान प्रक्रिया थंडावली होती. अखेरच्या टप्प्यात मतांची टक्केवारी वाढली. मात्र काही ठिकाणी किरकोळ घटना वगळता मतदान सुरळीत पार पडलंय. सर्वच दिग्गज नेते, उमेदवार, सेलिब्रिटींनी मतदानाचा हक्क बजावला. यंदाच्या निवडणुकीत सर्वच पक्ष स्वबळावर आखाड्यात उतरल्यामुळे पंचरंगी लढती होत आहे. त्यामुळे जनतेचा कौल कुणाला मिळाणार हे पाहण्याचं ठरणार आहे. आता 19 तारखेला जनतेचा फैसला होणार असून सत्तेच्या चाव्या कुणाच्या हातात देणार हे पाहण्याचं ठरणार आहे. गडचिरोलीत माओवाद्यांचा निवडणूक पथकावर हल्ला गडचिरोली जिल्ह्यात आज कडेकोट बंदोबस्तात मतदान झालं. माओवाद्यांचा प्रभाव असलेल्या या जिल्ह्यात दोन ठिकाणी निवडणूक पथकावर हल्ले झाले. चामोर्शी तालुक्यात मक्केपल्लीजवळ तसंच एटापल्ली तालुक्यातल्या ताडेपल्लीजवळ निवडणूक पथकावर हल्ला झाला. भूसुरुंग स्फोटासह माओवाद्यांनी गोळीबारही केला. या हल्ल्यात सीआरपीएफचा एक जवान जखमी झालाय. बर्‍याच ठिकाणी निवडणूक कर्मचार्‍यांच्या पथकाला सुरक्षा दलाच्या गराड्यातच प्रवास करावा लागत होता. अनेक निवडणूक पथकांना तब्बल 15 ते 20 किलोमीटरचा पायी प्रवास करावा लागला. वयोवृद्धांचा उत्साह वाखाण्याजोगा ! यावेळी वयोवृद्धांचा मतदानाला चांगला प्रतिसाद दिसून आला. राज्यभरात वेगवेगळ्या भागात अगदी नव्वदी पार केलेल्यांनीही मोठ्या उत्साहात मतदान केलं. पुण्यात 97 वर्षांच्या शालिनी माणकेश्वर यांनी स्वत: चालत जाऊन मतदान केलं. तर गुहागरमध्येही 90 वर्षांच्या सावित्री सावर्डेकर यांनीही मोठ्या उत्साहात मतदान केलं. रत्नागिरीतल्या 80 वर्षांच्या जानकी जाधव या आज्जीही यापैकी एक.मतदान करताना त्यांना इंदिरा गांधींचा काळ आठवला. पण, मी कुणाला मतदान करायचं हे स्वत:च ठरवते, असं त्यांनी आवर्जून सांगितलं. औरंगाबादमध्ये 95 वर्षांच्या आजोबांनी मतदानाचा हक्क बजावला. अकोल्यामध्ये तर 101 वर्षांच्या आजोबांनी मतदान केलं. मगनलाल वोरा, असं त्यांचं नाव आहे. त्यांनी भारत स्वतंत्र झाल्यापासून आतापर्यंत 15वेळा विधानसभेसाठी मतदान केलेय आणि आज 16व्या वेळा मतदान केलं. अंधांच्याही बोटांना शाई ठाण्यात अंध आणि अपंग मतदारांना मतदान करता यावं, यासाठी चांगली सोय करण्यात आली होती. अपंगांसाठी प्रशासनाने आवश्यक ती व्यवस्था केली होती तर अंधांसाठी ब्रेल लिपीमध्ये उमेदवारांची यादी होती. त्यांच्या मदतीसाठी स्वयंसेवकही सज्ज होते. मालाडमधल्या दिंडोशी मतदारसंघातही अपंग मतदारांनी आपला हक्क बजावला. तर दापोली तालुक्यातल्या पाजपंढरीमध्ये 100 अपंग बांधवांनी मतदानाचा अधिकार बजावला. विनाअडथळा मतदान करता आल्यानं या मतदारांनी समाधान व्यक्त केलं. मात्र काही ठिकाणी मात्र अपंग मतदारांना मतदानापासून वंचितही रहावं लागलं. मुंबईत घाटकोपरच्या बेस्ट कॉलनीतल्या अपंग मतदारांना चांगला रस्ता नसल्याने मतदानकेंद्रापर्यंत पोचताच आलं नाही. विशेष म्हणजे यामधले दोन मतदार शिवछत्रपती पुरस्काराचे विजेते आहेत. तरीही सरकार आणि निवडणूक आयोगाचं लक्ष नसल्यानं हे मतदार नाराज झालेत. पुण्यातही मतदान केंद्रांवर पुरेशा सोयी नसल्यामुळे अपंग व्यक्तींची चांगलीच तारांबळ उडाली. मतदाना केंद्रावर अपंग व्यक्ती करीता पुरेशा सोयीसुविधा नसल्याने मतदान करताना त्यांना अडचणीना तोंड द्यावं लागलं. +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]>

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

संबंधित बातम्या

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या