01 ऑगस्ट : चारही बाजूंनी निसर्गाच्या कुशीत वसलेल्या हे माळीण गाव अक्षरश: जमीनदोस्त झालंय. गोष्टींमध्ये असणारं आपल्या जीवलगांचं आटपाट नगर गेलं कुठे असा प्रश्न आता त्यांचे नातलग विचारत आहे. डोंगरकुशीत वसलेलं, निसर्गानं वेढलेलं हेच ते माळीण गाव असं जर आज कुणी म्हटलं तर खरं वाटणार नाही. ज्या डोंगराच्या कुशीत मोठ्या विश्वासानं हे गाव वसलं त्याच डोंगर कड्यानं या गावावर घाला घातला..संपूर्ण गाव उद्ध्वस्त झालं. काहीच उरलं नाही…174 घरांचं हे चिमुकलं गावं आदल्या रात्रीपर्यंत नांदत जागतं होतं.यावर विश्वास ठेवणंही अवघड आहे. आता इथे उरलाय फक्त मातीचा ढिगारा आणि त्याखाली दबली गेलेली स्वप्नं… बचावकार्य ,ढिगारा उपसण्याचं काम सुरू झालं. आपल्या जीवलगांना शोधण्यासाठी त्यांचे नातलग बाहेरगावाहून इथे आले खरे..पण आपली माणसं गेली कुठे हेच त्यांना कळत नाहीये. कारण आपल्या माणसांचं घर, गाव त्यांना काहीच सापडत नाहीये. त्यांचा ह्रदय पिळवटून टाकणारा आक्रोश सुन्न करून जातो. सध्याच्या माळीण गावाकडे पाहून कुसुमाग्रज कणा कवितेत म्हणतात तसं ‘भिंत खचली, चूल विझली…होते नव्हते नेले…‘याचीच वारंवार आठवण येते. माळीण गावावरचं संकट हा निसर्गाचा कोप आहे की मानवनिर्मित संकट आहे यावर आता चर्चा होतील, आरोप-प्रत्यारोप होतील,मदतीची,पुनर्वसनाची आश्वासनं दिली जातील, पण जे गेले ते जीवलग परत कसे येतील. +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]> |
---|
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++