JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / पावसाळ्याच्या तोंडावर 'माळीण'अजून उघड्यावरच !

पावसाळ्याच्या तोंडावर 'माळीण'अजून उघड्यावरच !

रायचंद शिंदे, माळीण 28 मे : स्मार्ट सिटीच्या धर्तीवर राज्यात 10 स्मार्ट गावं उभारण्यात येणार आहेत. पुणे जिल्ह्यातील माळीण गावापासून याची सुरूवात होणार आहे. पण पावसाळा तोंडावर येऊनही माळीणमधल्या गावकर्‍यांचे हाल संपलेले नाहीत आणि पावसाळ्यात तर परिस्थिती आणखी कठीण होणार आहे. 30 जुलै 2014…संपुर्ण माळीणगाव मातिखाली दबल. मदतीचा ओघ सुरू झाला. वर्षभरात माळीण उभ केलं जाईल असा शब्द सरकारनं दिला. पण 10 महिने संपले तरी अजून कामात विशेष प्रगती नाही.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

malin453 रायचंद शिंदे, माळीण 28 मे : स्मार्ट सिटीच्या धर्तीवर राज्यात 10 स्मार्ट गावं उभारण्यात येणार आहेत. पुणे जिल्ह्यातील माळीण गावापासून याची सुरूवात होणार आहे. पण पावसाळा तोंडावर येऊनही माळीणमधल्या गावकर्‍यांचे हाल संपलेले नाहीत आणि पावसाळ्यात तर परिस्थिती आणखी कठीण होणार आहे. 30 जुलै 2014…संपुर्ण माळीणगाव मातिखाली दबल. मदतीचा ओघ सुरू झाला. वर्षभरात माळीण उभ केलं जाईल असा शब्द सरकारनं दिला. पण 10 महिने संपले तरी अजून कामात विशेष प्रगती नाही. आता पावसाळा तोंडावर आलाय. तरी अजून घरं बांधलेली नाहीत. पत्र्याच्या तात्पुरत्या शेडमध्ये माळीणच्या ग्रामस्थांना पावसाळा कसा काढायचा हा प्रश्न पडलाय. 4 महिन्यापूर्वीच माळीणच्या पुनर्वसनासाठी आमडे गावातील 8 एकर जागा,खरेदी करण्यात आली. या जागेचे प्लॉटिंगही अजून केलेले नाही. माळीणकडे जाणार्‍या रस्त्याच काम नुकतचं झालं. पण एकाच महिन्यात रस्त्याची खस्ता हालत झाली आहे. सरकारच्या आश्वासनावर विश्वास ठेवण्यापलीकडे, माळीणकरांच्या हाती काही नाही. तर दुसरीकडे हा पावसाळाही माळीणच्या ग्रामस्थांना पत्राच्या घरातचं काढावा लागेलं असं दिसतंय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]>

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

संबंधित बातम्या

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या