JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / विदर्भात सर्वच पक्षांच्या स्टार प्रचारकांच्या सभा

विदर्भात सर्वच पक्षांच्या स्टार प्रचारकांच्या सभा

04 एप्रिल : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी विदर्भात सर्व पक्षांच्या स्टार प्रचारकांच्या सभा आयोजित करण्यात आल्या आहेत. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यवतमाळ-वाशिम मतदार संघातल्या उमेदवार शिवाजीराव मोघे यांच्यासाठी आज सभा घेणार आहेत तर भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी हे ही आज विदर्भात आहेत. ते चंद्रपूर इथं हंसराज अहिर यांच्या प्रचारासाठी सभा घेणार आहेत. संबंधित बातम्या {{display_headline}} तर काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार भंडारा-गोंदिया मतदार संघातील उमेदवार प्रफुल्ल पटेल आणि विलास मुत्तेमवार यांच्यासाठी उद्या भंडारा आणि नागपुरात सभा घेणार आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

politician-cartoon-in-india 04 एप्रिल :  लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी विदर्भात सर्व पक्षांच्या स्टार प्रचारकांच्या सभा आयोजित करण्यात आल्या आहेत. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यवतमाळ-वाशिम मतदार संघातल्या उमेदवार शिवाजीराव मोघे यांच्यासाठी आज सभा घेणार आहेत तर भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी हे ही आज विदर्भात आहेत. ते चंद्रपूर इथं हंसराज अहिर यांच्या प्रचारासाठी सभा घेणार आहेत.

संबंधित बातम्या

तर काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार भंडारा-गोंदिया मतदार संघातील उमेदवार प्रफुल्ल पटेल आणि विलास मुत्तेमवार यांच्यासाठी उद्या भंडारा आणि नागपुरात सभा घेणार आहेत. त्यांच्याबरोबर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारही उपस्थित राहणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बुलढाणा येथे प्रतापराव जाधव यांच्यासाठी सभा घेणार आहेत. अमरावतीत पाच तारखेला आणि सहा तारखेला रामटेक येथेही उद्धव ठाकरेंची सभा होणार आहे. सात एप्रिलला यवतमाळ - वाशिम मतदार संघातील मनसेचे उमेदवार राजू पाटील राजे यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे यांची सभा होणार आहे. यात मुख्यमंत्री पृथ्वाराज चव्हाण आज नागपूर मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार विलास मुत्तेमवार यांच्यासाठी तीन सभा घेणार आहेत. युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे रामटेक मतदार संघातील पाटणसावंगी येथे शिवसेनेचे उमेदवार कृपाल तुमाने यांच्यासाठी प्रचार सभा घेणार आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या