06 सप्टेंबर : मुंबईत छायाचित्रकार तरुणीवर सामूहिक बलात्कार प्रकरणातील चारही आरोपींची आज ओळख परेड पूर्ण झाली. पीडित तरुणीनं या चारही आरोपींना ओळखल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. या प्रकरणी 5 आरोपी आहेत. त्यातला एक आरोपी अल्पवयीन आहे. तर ज्या ठिकाणी ही घटना घडली तिथे पुन्हा अशी घटना घडू नये साठी शक्ती मिलला तारेचं कुंपण घालण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले आहे. तसंच मिलमध्ये प्रवेशावर बंदी आणि परिसरात मोठे लाईट्स लावण्याचे आदेशही कोर्टाने दिले आहेत. 22 ऑगस्ट रोजी महालक्ष्मी येथील शक्ती मिल कम्पाऊंडमध्ये पीडित छायाचित्रकार तरूणी आपल्या सहकार्यासोबत फोटोशूट करण्यासाठी गेली होती. त्यावेळी या पाच नराधमांनी तिच्या सहकार्याला बेदम मारहाण करून तिच्यावर दोघांनी अत्याचार केला होता. या प्रकरणी तीनच दिवसात पाचही आरोपींना अटक करण्यात आलीय. या पाचही आरोपींनी बलात्कार केल्याची कबुली दिली होती. या पाचही आरोपींची आता न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली तर एक आरोपी अल्पवयीन असल्यामुळे त्याला डोंगरी येथील बालसुधारगृहात रवानगी करण्यात आलीय. या प्रकरणातील महत्त्वाचे मुद्दे