JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / व्याजदर जैसे थेच !

व्याजदर जैसे थेच !

02 डिसेंबर : महागाईने होरपळणार्‍या सर्वसामान्यांना रिझर्व्ह बँकेने ‘कही खुशी कही गम’ असा दिलासा दिलाय. आरबीआयने पॉलिसी रिव्ह्यु जाहीर केलाय. यात व्याजदर जैसे थेच ठेवण्यात आले आहे. पण व्याजदरात कपात होईल अशी चातकासारखी वाट पाहणार्‍यांच्या पदरी निराशाच आलीये. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI)ने आज अर्थव्यवस्थेसाठीचा आपला पॉलिसी रिव्ह्यु जाहीर केला. यात बँकांसाठीच्या व्याजदरांमध्ये कपात करण्यासाठीच्या सूचना केंद्राकडून वारंवार देण्यात आल्या होत्या. पण तरीही ठाम पवित्रा घेत आरबीआयचे गर्व्हनर रघुराम राजन यांनी हे व्याजदर कायम ठेवले आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

rbi_new2 02 डिसेंबर : महागाईने होरपळणार्‍या सर्वसामान्यांना रिझर्व्ह बँकेने ‘कही खुशी कही गम’ असा दिलासा दिलाय. आरबीआयने पॉलिसी रिव्ह्यु जाहीर केलाय. यात व्याजदर जैसे थेच ठेवण्यात आले आहे. पण व्याजदरात कपात होईल अशी चातकासारखी वाट पाहणार्‍यांच्या पदरी निराशाच आलीये.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI)ने आज अर्थव्यवस्थेसाठीचा आपला पॉलिसी रिव्ह्यु जाहीर केला. यात बँकांसाठीच्या व्याजदरांमध्ये कपात करण्यासाठीच्या सूचना केंद्राकडून वारंवार देण्यात आल्या होत्या. पण तरीही ठाम पवित्रा घेत आरबीआयचे गर्व्हनर रघुराम राजन यांनी हे व्याजदर कायम ठेवले आहेत. महागाईचा दर काबूत आला आणि अर्थव्यवस्थेच्या प्रगतीचा दर सुधारला तर पुढच्या वर्षी बँकांसाठीच्या व्याजदरात कपात करण्याचे संकेत रघुराम राजन यांनी दिले आहेत. पण घर घेण्यासाठी कर्ज घेण्याची वाट पाहणार्‍यांची मात्र आरबीआयच्या निर्णयामुळे निराशा होणार आहे. कारण होमलोनचे व्याजदर आता कमी होण्याची शक्यता सध्यापुरती मावळलीये. आता 2015मध्येच हे दर कमी होऊ शकतात. +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]>

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

संबंधित बातम्या

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या