JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / ठाकरेंकडे इतकी संपत्ती आली कुठून ?-जाधव

ठाकरेंकडे इतकी संपत्ती आली कुठून ?-जाधव

20 जानेवारी : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे कुटुंबीयांमध्ये संपत्तीवरुन वाद सुरू झालाय. मात्र या वादात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी उडी घेतली आहे. बाळासाहेबांकडे इतकी संपत्ती आली कुठून हे आधी त्यांनी जाहीर करावं, मगच हा वाद कोर्टात का गेला याचं स्पष्टीकरण होईल अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी दिली. जाधव एवढ्यावरच थांबले नाही ते म्हणतात, ठाकरे कुटुंबीयांचा कुठे एखादा कारखाना आहे हे मी पाहिलं नाही, त्यांचा कुठे व्यवसाय आहे हेही मी पाहिलं नाही, ते सतत म्हणायचे पवारांना शेत करता येत नाही तर यांच्याकडे कुठे शेतीही नाही.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

235 bhaskar 20 जानेवारी : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे कुटुंबीयांमध्ये संपत्तीवरुन वाद सुरू झालाय. मात्र या वादात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी उडी घेतली आहे. बाळासाहेबांकडे इतकी संपत्ती आली कुठून हे आधी त्यांनी जाहीर करावं, मगच हा वाद कोर्टात का गेला याचं स्पष्टीकरण होईल अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी दिली.

जाधव एवढ्यावरच थांबले नाही ते म्हणतात, ठाकरे कुटुंबीयांचा कुठे एखादा कारखाना आहे हे मी पाहिलं नाही, त्यांचा कुठे व्यवसाय आहे हेही मी पाहिलं नाही, ते सतत म्हणायचे पवारांना शेत करता येत नाही तर यांच्याकडे कुठे शेतीही नाही. उद्धव ठाकरेंना फोटोग्राफीचा छंद आहे पण त्यांचा कुठे फोटो स्टुडिओ दिसत नाही. मग एवढं सगळं नसताना ठाकरेंकडे एवढी संपत्ती आली कुठून अशी खोचक टीका जाधव यांनी केली.

बाळासाहेब ठाकरे हे शिवसैनिकांनाच संपत्ती मानत होते, असंही जाधव म्हणाले. बाळासाहेबांच्या संपत्तीवरुन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबई हायकोर्टात प्रोबिट याचिका दाखल केली आहे तर या याचिकेला जयदेव ठाकरे यांनी आक्षेप घेतला आहे. बाळासाहेबांच्या मृत्युपत्रावर त्यांची स्वाक्षरी नाही असा जयदेव यांचा आक्षेप आहे तर मृत्युपत्रात संपत्तीबाबतच्या अनेक गोष्टींचा समावेश नाही असा आक्षेपही जयदेव यांनी घेतलाय. ठाकरे कुटुंबीयांचा वाद चव्हाट्यावर आलाय यावर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी तोंडसुख घेण्याचा प्रयत्न केलाय.

संबंधित बातम्या

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या