JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / टोल वसुली पूर्ण होऊनही लूट सुरूच !

टोल वसुली पूर्ण होऊनही लूट सुरूच !

29 जानेवारी : राज्यात टोलचा प्रश्न पेटलाय. तर दुसरीकडे परभणीत मात्र उड्डाणपूलावर झालेला खर्च दुपटीने वसूल झाला तरी टोलवसुली मात्र सुरूच आहे. 11 कोटींच्या उड्डाणपुलासाठी तब्बल 12 वर्ष टोलवसुली सुरू असल्याचं उघड झालंय. परभणी शहरातला हा एकमेव पूल 1999 मध्ये बांधण्यात आला. 3 वर्षांत हा पूल तयार झाला. त्यासाठी 4 टोलनाके बांधले. टोल आंदोलनात यातले गंगाखेडचा टोलनाका वगळता 3 टोलनाके बंद करण्यात आले आहेत. जवळपास दुपटीने खर्च वसूल झाला तरी इथल्या उड्डाणपूलावर साधे लाईटही लावण्यात आलेले नाही की कोणत्याही सुविधा नागरिकांना देण्यात आलेल्या नाहीत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

435 parbhani toll news 29 जानेवारी : राज्यात टोलचा प्रश्न पेटलाय. तर दुसरीकडे परभणीत मात्र उड्डाणपूलावर झालेला खर्च दुपटीने वसूल झाला तरी टोलवसुली मात्र सुरूच आहे. 11 कोटींच्या उड्डाणपुलासाठी तब्बल 12 वर्ष टोलवसुली सुरू असल्याचं उघड झालंय.

परभणी शहरातला हा एकमेव पूल 1999 मध्ये बांधण्यात आला. 3 वर्षांत हा पूल तयार झाला. त्यासाठी 4 टोलनाके बांधले. टोल आंदोलनात यातले गंगाखेडचा टोलनाका वगळता 3 टोलनाके बंद करण्यात आले आहेत.

जवळपास दुपटीने खर्च वसूल झाला तरी इथल्या उड्डाणपूलावर साधे लाईटही लावण्यात आलेले नाही की कोणत्याही सुविधा नागरिकांना देण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे हाही टोलनाका बंद करण्याची मागणी नागरिक करत आहेत. टोलवसुली कशासाठी ?

संबंधित बातम्या

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या