JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / टोलची तोडफोड, नितेश राणेंना अटक

टोलची तोडफोड, नितेश राणेंना अटक

03 डिसेंबर : उद्योगमंत्री मंत्री नारायण राणे यांचे पुत्र आणि स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष नितेश राणे यांना टोल नाक्यावर अडवल्यामुळे त्यांचा ‘स्वाभिमान’ दुखावला त्यामुळे त्यांनी टोल नाक्यावरच्या कर्मचार्‍यांना धक्काबुक्की केली आणि टोलची तोडफोड केली. ही घटना घडली. उत्तर गोवा जिल्ह्यातल्या धारगळ गावात. या प्रकरणी नितेश राणे यांच्यासह आठ जणांना अटक करण्यात आली आहे. उत्तर गोवा जिल्ह्यातल्या धारगळ गावातल्या चेक पोस्टजवळ टोल नाक्यावर नितेश राणेंची गाडी अडवण्यात आली. राणेंच्या कार्यकर्त्यांनी ही गाडी खासदार नितेश राणे यांची गाडी आहे तुम्ही अडवू शकत नाही असं उत्तर दिलं.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

nithish rane 03 डिसेंबर : उद्योगमंत्री मंत्री नारायण राणे यांचे पुत्र आणि स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष नितेश राणे यांना टोल नाक्यावर अडवल्यामुळे त्यांचा ‘स्वाभिमान’ दुखावला त्यामुळे त्यांनी टोल नाक्यावरच्या कर्मचार्‍यांना धक्काबुक्की केली आणि टोलची तोडफोड केली. ही घटना घडली. उत्तर गोवा जिल्ह्यातल्या धारगळ गावात. या प्रकरणी नितेश राणे यांच्यासह आठ जणांना अटक करण्यात आली आहे.

उत्तर गोवा जिल्ह्यातल्या धारगळ गावातल्या चेक पोस्टजवळ टोल नाक्यावर नितेश राणेंची गाडी अडवण्यात आली. राणेंच्या कार्यकर्त्यांनी ही गाडी खासदार नितेश राणे यांची गाडी आहे तुम्ही अडवू शकत नाही असं उत्तर दिलं. पण टोल नाक्यावरील कर्मचार्‍यांनी तुमच्या गाडीवर लाल दिवा नाही त्यामुळे गाडीमध्ये खासदार आहे की सर्वसामान्य माणूस हे कसं कळणार असं प्रतिउत्तर दिलं. कर्मचारी आणि कार्यकर्त्यांमध्ये यावरून वाद झाला. त्यामुळे एकच गोंधळ उडाला.

काही कळायच्या आता राणेंच्या गाडीतून तीन-चार कार्यकर्ते उतरले आणि त्यानी तीन कर्मचार्‍यांना बेदम मारहाण केली. त्यानंतर कर्मचार्‍यांनी पेडणे पोलीस स्टेशन गाठून तक्रार केली. कर्मचार्‍यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात नितेश राणे यांनीही आपल्या धक्काबुक्की केल्याचं सांगितलंय. तिघांही नजीकच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. या प्रकरणी ाहे. राणेंच्या विरोधात कलम 353 आणि कलम 506 अन्वये गुन्हे दाखल केलाय. राणेंसह आठ जणांना अटक करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या