JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / 'खुद्द बाळासाहेबांनी दिली शपथ' !

'खुद्द बाळासाहेबांनी दिली शपथ' !

23 जानेवारी : आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती. त्यानिमित्ताने मुंबईतील सोमय्या मैदानावर शिवबंधन आणि प्रतिज्ञा घेण्यासाठी लाखोच्या संख्येनं शिवसैनिक मुंबईतील एकत्र जमले होते. उद्धव ठाकरे यांच्या भाषणाला सुरुवात झाली आणि या भाषणात बाळासाहेबांची एक ध्वनीफित ऐकवण्यात आली. बाळासाहेबांच्या आवाजाची ध्वनीफित सुरू झाली तेव्हा शिवसैनिकांनी ‘परत या परत बाळासाहेब परत या’ या घोषणांनी मैदान दणाणून सोडले. पुढच्या क्षणाला बाळासाहेबांनी बोलावं आणि शिवसैनिकांनी ऐकावं असं कधी झालं नाही. बाळासाहेबांच्या आवाजाची ध्वनीफित सुरू झाली आणि त्यांच्यापाठोपाठ शिवसैनिकांनी शपथ घेतली.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

1351278425_shivsena_chief 23 जानेवारी : आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती. त्यानिमित्ताने मुंबईतील सोमय्या मैदानावर शिवबंधन आणि प्रतिज्ञा घेण्यासाठी लाखोच्या संख्येनं शिवसैनिक मुंबईतील एकत्र जमले होते.

उद्धव ठाकरे यांच्या भाषणाला सुरुवात झाली आणि या भाषणात बाळासाहेबांची एक ध्वनीफित ऐकवण्यात आली. बाळासाहेबांच्या आवाजाची ध्वनीफित सुरू झाली तेव्हा शिवसैनिकांनी ‘परत या परत बाळासाहेब परत या’ या घोषणांनी मैदान दणाणून सोडले. पुढच्या क्षणाला बाळासाहेबांनी बोलावं आणि शिवसैनिकांनी ऐकावं असं कधी झालं नाही. बाळासाहेबांच्या आवाजाची ध्वनीफित सुरू झाली आणि त्यांच्यापाठोपाठ शिवसैनिकांनी शपथ घेतली..

संबंधित बातम्या

“मी,माझ्या कुलदैवताला आणि छत्रपती शिवरायाला स्मरून शपथ घेतो की, मी माझ्या शिवसेना या संघटनेशी आजन्म इमान राखीन. पद असो, वा नसो मी एक, मी एक निष्ठ शिवसैनिक म्हणून शिवसेनेशी कधीही गद्दारी वा बेईमानी करणार नाही. शिवसेनाप्रमुखांचे आदेश मी एका कडवट निष्ठेनं पाळीन. त्याचबरोबर येत्या निवडणुकीत शिवसेनेचे भगवा फडकवण्याचं जे स्वप्न आहे ते निष्ठेनं शपथपूर्वक पूर्ण करीन.”

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या