17 ऑगस्ट : खतरनाक दहशतवादी सय्यद अब्दुल करीम उर्फ तुंडाला अटक करण्यात आलीय. दिल्ली पोलिसांनी टुंडाला भारत-नेपाळ सीमेवर अटक करुन भारतात आणलंय. टुंडाला कोर्टाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावलीय.
टुंडा हा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक आणि लष्कर-ए-तय्यबाचा अतिरेकी आहे. 1996 ते 1998 दरम्यान दिल्ली आणि परिसरात झालेल्या 40 अतिरेकी हल्ल्यांचा तो मास्टरमाईंड आहे.
90 च्या दशकात टुंडा पाकिस्तानात पळून गेला होता. तिथे लष्कर-ए-तय्यबासोबत त्यानं भारतविरूद्ध अतिरेकी कारवाया सुरू ठेवल्या होत्या.
17 ऑगस्ट : खतरनाक दहशतवादी सय्यद अब्दुल करीम उर्फ तुंडाला अटक करण्यात आलीय. दिल्ली पोलिसांनी टुंडाला भारत-नेपाळ सीमेवर अटक करुन भारतात आणलंय. टुंडाला कोर्टाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावलीय.
टुंडा हा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक आणि लष्कर-ए-तय्यबाचा अतिरेकी आहे. 1996 ते 1998 दरम्यान दिल्ली आणि परिसरात झालेल्या 40 अतिरेकी हल्ल्यांचा तो मास्टरमाईंड आहे.
90 च्या दशकात टुंडा पाकिस्तानात पळून गेला होता. तिथे लष्कर-ए-तय्यबासोबत त्यानं भारतविरूद्ध अतिरेकी कारवाया सुरू ठेवल्या होत्या. त्याच्याकडून एक पाकिस्तानी पासपोर्ट जप्त करण्यात आला असून अब्दुल कुदुसच्या नावे हा पासपोर्ट देण्यात आला होता. कोण आहे टुंडा?
- भारताच्या 20 जणांच्या मोस्ट वॉन्टेड यादीत समावेश
- भारतातल्या आधुनिक जिहादी चळवळीचा संस्थापक
- लष्कर-ए-तय्यबाचा आघाडीचा बॉम्ब एक्स्पर्ट
- उत्तर प्रदेशातल्या गाझियाबादचा रहिवासी
- 80 च्या दशकात तो आयएसआयच्या संपर्कात आला
- त्यानंतर स्फोटकं तयार करण्याच्या प्रशिक्षणासाठी पाकिस्तानात गेला
- डिसेंबर 1996 ते जानेवारी 1998 दरम्यान अनेक बॉम्बस्फोटांत तो सहभागी होता
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.