गोविंद वाकडे, 30 जानेवारी : पिंपरी चिंचवडमधील भोसरी इंद्रायणी नगरची निवडणूक लक्षवेधी ठरणार आहे. या प्रभागातून माजी आमदार विलास लांडे आपल्या मुलाला राजकीय रिंगणात उतरवतायेत. तर आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांनी आपल्या समर्थकांच्या उमेदवारीसाठी प्रतिष्ठा पणाला लावलीये. पिंपरी चिंचवड महापालिकेत बहुरंगी लढत होतेय. पण पिंपरी चिंचवडच्या भोसरी इंद्रायणीनगरच्या प्रभाग क्रमांक आठमधील निवडणुकीत स्थानिक नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेय. राष्ट्रवादीचे माजी आमदार विलास लांडेंनी मुलगा विक्रांत लांडेंना रिंगणात उतरवलंय.
आपण आपल्या आईवडिलांचा समाजकार्याचा वारसा पुढे चालवणार असल्याचं विक्रांत राणे म्हणाले. दुसरीकडे भाजपमध्येही भोसरी इंद्रायणीनगर वॉर्डातून आपल्याच समर्थकाला उमेदवारी मिळावी यासाठी आमदार महेश लांडगे आणि लक्ष्मण जगताप आग्रही आहेत. लांडगेंनी तुषार सहाने यांच्यासाठी तर लक्ष्मण जगताप सारंग कामतेकरांसाठी जोरदार फिल्डिंग लावलीये. या प्रभागात शिवसेना मनसे आणि काँग्रेसचेही उमेदवार असणार आहेत. मात्र आमदारांच्या प्रतिष्ठेपुढे त्यांचा किती टिकाव लागेल हे आत्ताच सांगता येणार नाही. भोसरी इंद्रायणी नगरवर कुणाचं वर्चस्व आहे हे निकालानंतरच खऱ्या अर्थानं स्पष्ट होणार आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेज ला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv