11 मे : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या ठावठिकाण्याबाबत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी आज लोकसभेत निवेदन सादर केले. दाऊदला भारताच्या ताब्यात देण्याबाबत पाकिस्तानकडे वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला आहे. त्याबाबत पाकिस्तानला वारंवार पुरावेही देण्यात आले आहे. मात्र, पाकिस्तानकडून अजून कोणतंही सकारात्मक पाऊल उचलण्यात आलेलं नाही, तसंच दाऊदला भारताच्या ताब्यात सोपविण्यासंदर्भात कोणत्याही कायदेशीर प्रक्रियेला सुरूवात केलेली नाही. त्यामुळे वेळप्रसंगी पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय दबाव वाढवून त्याला कोणत्याही परिस्थितीत भारतात आणणारच, अशी माहिती गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी या वेळी दिली.
कुख्यात डॉन आणि 1993च्या मुंबई बॉम्बस्फोट हल्ल्याचा मास्टर माईंड दाऊद इब्राहिम पाकिस्तानातच असून, त्याच्या विरोधात पाकिस्तानला वारंवार पुरावे दिलेत. पण पाकिस्तान त्यावर काहीच प्रतिसाद देत नसल्याचं सांगत कोणत्याही परिस्थितीत त्याला भारतात आणणारच, असा विश्वासही राजनाथ सिंह यांनी आज व्यक्त केला. दरम्यान, काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांनी दाऊदचा ठावठिकाणा माहीत नसल्याचं निवेदन संसदेत केलं होतं. राजनाथ सिंहांचं आजचं निवेदन याच्या उलट आहे.
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]> |
---|
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++