13 मार्च : लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आपली दुसरी उमेदवारांची यादी जाहीर केलीय. काँग्रेसने दुसर्या यादीत एकूण 71 जणांना उमेदवारी बहाल केलीय. महाराष्ट्रातून सात जणांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडलीय. पण पुण्यातून कॉमनवेल्थ घोटाळ्यातील आरोपी सुरेश कलमाडी आणि नांदेडमधून आदर्श घोटाळ्यातील आरोपी अशोक चव्हाण यांच्या उमेदवारीबाबत पत्ते झाकूनच ठेवले आहे.
हिंगोलीतून राजीव सातव यांना उमेदवारी देण्यात आलीय. तर जालन्यातून विलास अवताडे यांना उमेदवारी दिलीय. तर हातकणंगलेमध्ये स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी आणि रघुनाथदादा पाटील यांच्या विरोधात कलाप्पा अण्णा आवाडे यांना उमेदवारी देत रिंगणात उतरवले आहे.
तर अकोल्यामधून मुस्लिम कार्ड खेळत हिदायक पटेल यांना उमेदवारी देण्यात आलीय. विशेष म्हणजे राष्ट्रवादीने हातकणंगलेच्या जागेमुळे 22/26 च्या फॉर्म्युल्यावरुन नमत घेतलं. त्यामुळे 22-27 असा फॉर्म्युला तयार झाला. त्यामुळे हातकणंगले मधून कलाप्पा अण्णा आवाडे आणि जालन्यातून विलास अवताडे यांना रिंगणात उतरवण्यात आले.
महाराष्ट्रातील काँग्रेसचे 7 उमेदवार