29 मे : लोकसभा निवडणूकीत दारूण पराभव झालेल्या मनसे पुन्हा एकदा ‘रुळावर’ येण्याचा खटाटोप करत आहे. कल्याण येथील बिर्ला स्कूलमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी काल तोडफोड केली. स्थानिक विद्यार्थ्यांना प्रवेश देत नाही असा आरोप करत त्यांनी ही तोडफोड केली. शाळेचे व्यवस्थापक विजय टोकावडे यांनाही बेदम मारहाण केली आहे. शाळेतल्या प्रवेश प्रक्रियेत स्थानिक मुलांना डावलण्यात येतं, अशी तक्रार काही पालकांनी मनसेकडे केली होती. त्यानंतर आपण प्रशासनाबरोबर चर्चा केली पण त्यांनी उडवाउडवीची उत्तर दिल्यामुळे मनसेकार्यकर्ते संतप्त झाले आणि त्यांनी तोडफोड केली असा दावा कल्याणचे आमदार प्रकाश भोईर यांनी केला आहे. दरम्यान, पोलिसांनी प्रकाश भोईरसह मनसेच्या काही कार्यकर्त्यांना अटक केली होती पण त्यांना न्यायालयानी जामिनावर मुक्त केलं आहे. +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]> |
---|
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++