29 मे : मोदी सरकार स्थापन झाल्यानंतर कलम 370 जम्मू आणि काश्मिरला विशेष राज्याचा दर्जा देणारे हे कलम रद्द करावे अशी हालचाल सुरू झाली आहे यावरुन गेल्यादोन दिवसांपासून मोठा वाद रंगला आहे. आता कलम 370 रद्द करण्याला एनडीएचे मित्रपक्ष शिवसेनेनंही पाठिंबा दर्शवला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन याला पाठिंबा दिला.
कलम 370 वर चर्चा किती करायची ? आता आपण काही बोलणार यावर काश्मीरचे नेते काही बोलणार ? मग प्रतिक्रिया, क्रीया येतच राहणार त्यापेक्षा इच्छा असेल तर कृती करा असं आव्हान उद्धव ठाकरेंनी भाजपला दिलंय. कलम 370 रद्द केल्यानंतर समान नागरी कायदाही करा, अशी मागणीही उद्धव यांनी केली. तसंच अनेकांना असं वाटतं की, आपण मुख्यमंत्री व्हावं, पण माझ्या कार्यकर्त्यांना जर मी मुख्यमंत्री व्हावं असं वाटत असेल तर यासाठी भाग्य लागतं, त्यांच्या प्रेमावर माझी वाटचाल सुरू आहे असं सांगत उद्धव यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंना टोला लगावला.
लोकसभा निवडणुकीत सुपडा साफ झाल्यानंतर मनसेच्या पदाधिकार्यांनी बैठक घेतली. यावेळी भाजपच्या पंतप्रधानपदाचा फॉर्म्युल्या प्रमाणे मनसेच्या पदाधिकार्यांनी राज यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार जाहीर करावे असा सूर लगावला. याबाबत राज यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल असं आमदार प्रवीण दरेकर यांनी स्पष्ट केलं होतं. मनसेसैनिकांच्या या मागणीचा उद्धव यांनी समाचार घेत मुख्यमंत्री होण्यासाठी भाग्य लागते असा टोला लगावलाय.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]> |
---|
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++