JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / एका महिन्यात 80 लाख रुपये भरा, राजू शेट्टींना नोटीस

एका महिन्यात 80 लाख रुपये भरा, राजू शेट्टींना नोटीस

03 फेब्रुवारी : उसदर आंदोलनामुळं चर्चेत आलेले राजू शेट्टी आता अडचणीत सापडले आहेत. आंदोलनात झालेल्या नुकसान भरपाईसाठी राजू शेट्टी यांना कोल्हापूरच्या जिल्हाधिकार्‍यांनी नोटीस बजावली आहे. 80 लाख रुपये एक महिन्याच्या आत भरा, नाहीतर तुमच्या संपत्तीवर टाच आणून पैसे वसूल केले जातील असं नोटीसमध्ये म्हटलंय. संबंधित बातम्या {{display_headline}} शेट्टींसह स्वाभिमानीच्या 80 कार्यकर्त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. तर दुसरीकडे जिल्हाधिकार्‍यांनी माझी बाजूही ऐकून घेतली नाही असो आरोप राजू शेट्टींनी केला आहे. आंदोलनं करणार्‍या बाकीच्या पक्षांवर कारवाई का करत नाही असा सवालही त्यांनी केला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

Image raju_sheti_300x255.jpg 03 फेब्रुवारी : उसदर आंदोलनामुळं चर्चेत आलेले राजू शेट्टी आता अडचणीत सापडले आहेत. आंदोलनात झालेल्या नुकसान भरपाईसाठी राजू शेट्टी यांना कोल्हापूरच्या जिल्हाधिकार्‍यांनी नोटीस बजावली आहे. 80 लाख रुपये एक महिन्याच्या आत भरा, नाहीतर तुमच्या संपत्तीवर टाच आणून पैसे वसूल केले जातील असं नोटीसमध्ये म्हटलंय.

संबंधित बातम्या

शेट्टींसह स्वाभिमानीच्या 80 कार्यकर्त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. तर दुसरीकडे जिल्हाधिकार्‍यांनी माझी बाजूही ऐकून घेतली नाही असो आरोप राजू शेट्टींनी केला आहे. आंदोलनं करणार्‍या बाकीच्या पक्षांवर कारवाई का करत नाही असा सवालही त्यांनी केला आहे. त्यामुळे आंदोलनाचं श्रेय घेणारे नेते नुकसान भरपाई करायला मात्र टाळाटाळ करताना दिसतायेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या