JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / आम्ही 'सामना'तून भूमिका मांडतो, 'ते' पोस्टर अधिकृत नाही : शिवसेना

आम्ही 'सामना'तून भूमिका मांडतो, 'ते' पोस्टर अधिकृत नाही : शिवसेना

21 ऑक्टोबर : शिवसेनाभवनासमोरचं भाजपला डिवचणारं ते वादग्रस्त पोस्टर अखेर काढून टाकण्यात आलंय. हे पोस्टर म्हणजे शिवसेनेची अधिकृत भूमिका नाही. आम्हाला भूमिका मांडायची असली तर ती ‘सामना’मधून मांडण्यात येते अशी सारवासारव शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली. या पोस्टरमध्ये भाजपमध्ये स्वर्गीय भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्यापासून ते थेट नरेंद्र मोदींपर्यंत शिवसेना प्रमुखांसमोर कसे झुकले होते, यासंबंधीचे फोटोच लावण्यात आले होते. “झुकल्या होत्या त्यांच्या गर्विष्ठ माना…बाळासाहेबांच्या चरणी”, असा त्या पोस्टरचा मथळा होता.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

shiva sena 1 21 ऑक्टोबर : शिवसेनाभवनासमोरचं भाजपला डिवचणारं ते वादग्रस्त पोस्टर अखेर काढून टाकण्यात आलंय. हे पोस्टर म्हणजे शिवसेनेची अधिकृत भूमिका नाही. आम्हाला भूमिका मांडायची असली तर ती ‘सामना’मधून मांडण्यात येते अशी सारवासारव शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली.

या पोस्टरमध्ये भाजपमध्ये स्वर्गीय भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्यापासून ते थेट नरेंद्र मोदींपर्यंत शिवसेना प्रमुखांसमोर कसे झुकले होते, यासंबंधीचे फोटोच लावण्यात आले होते.

“झुकल्या होत्या त्यांच्या गर्विष्ठ माना…बाळासाहेबांच्या चरणी”, असा त्या पोस्टरचा मथळा होता. पण या पोस्टरवर टीका होताच तासाभरातच हे पोस्टर काढून टाकण्यात आलं. पोलिसांकरवी हे पोस्टर काढण्यात आलंय.

संबंधित बातम्या

पोस्टर काढल्यामुळे हा वाद तात्पुरता मिटला असला तरी यानिमित्ताने सेना- भाजपातल्या कुरघोडीचं राजकारण आत्ताच कुठल्या थराला जाऊन पोहोचलं हे स्पष्ट होतंय. दरम्यान, हे पोस्टर्स म्हणजे पक्षाची अधिकृत भूमिका नाही, असं शिवसेनेनं स्पष्ट केलंय. कार्यकर्त्यांनी रागाच्या भरात तसे पोस्टर्स लावले असावेत, अशी भूमिका संजय राऊत यांनी मांडली.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]>

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या