JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / अडवाणी नाराज नाही -सुषमा स्वराज

अडवाणी नाराज नाही -सुषमा स्वराज

14 सप्टेंबर : नरेंद्र मोदी यांची पंतप्रधानपदाच्या उमेदवारीसाठी निवड केल्यामुळे लालकृष्ण अडवाणी यांची नाराजी दूर करण्यासाठी भाजप नेत्यांचे प्रयत्न सुरू आहे. पक्षनेत्या सुषमा स्वराज आणि भाजप नेते अनंतकुमार यांनी लालकृष्ण अडवाणी यांची भेट घेऊन त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. या भेटीनंतर अडवाणी नाराज नाही, असं स्वराज यांनी सांगितलं. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून मोदींच्या नावाची शुक्रवारी घोषणा करण्यात आली. पण मोदींच्या नावाला अडवाणींचा साफ विरोध होता. मोदींचं नाव जाहीर करु नये अशी ठाम मागणी अडवाणींनी पक्षाध्यक्ष राजनाथ सिंह यांच्याकडे केली होती.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

Sushma Swaraj 14 सप्टेंबर : नरेंद्र मोदी यांची पंतप्रधानपदाच्या उमेदवारीसाठी निवड केल्यामुळे लालकृष्ण अडवाणी यांची नाराजी दूर करण्यासाठी भाजप नेत्यांचे प्रयत्न सुरू आहे. पक्षनेत्या सुषमा स्वराज आणि भाजप नेते अनंतकुमार यांनी लालकृष्ण अडवाणी यांची भेट घेऊन त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. या भेटीनंतर अडवाणी नाराज नाही, असं स्वराज यांनी सांगितलं. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून मोदींच्या नावाची शुक्रवारी घोषणा करण्यात आली. पण मोदींच्या नावाला अडवाणींचा साफ विरोध होता. मोदींचं नाव जाहीर करु नये अशी ठाम मागणी अडवाणींनी पक्षाध्यक्ष राजनाथ सिंह यांच्याकडे केली होती. पण संघाने मोदींच्या नावावर शिक्कामोर्तब केल्यामुळे मोदींच्या नावाच्या घोषणेची जबाबदारी भाजपवर सोपवली होती. पण अडवाणींच्या विरोधामुळे भाजपमधील मतभेद समोर आले. शुक्रवारी दिवसभर भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी अडवाणींची भेट घेऊन मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचा विरोध शेवटपर्यंत कायम राहिला. ऐन घोषणेच्या तासभराअगोदर मोदी दिल्लीत दाखल झाले. त्यांनी अडवाणींची भेट घेतली आणि त्यांना घेऊन त्यांच्या निवासस्थानातून बाहेरही पडले होते. अडवाणी मुख्यकार्यालयाकडे निघाले असताना अर्ध्यावाटेतूनच माघारी परतले. ते माघारी का परतले हे अजूनही कळू शकले नाही. तर दुसरीकडे राजनाथ सिंह यांनी पत्रकार परिषद घेऊन मोदींच्या नावाची घोषणाही केली. या घोषणेनंतर अडवाणींनी राजनाथ यांना पत्र लिहून आपली नाराजीही स्पष्ट केली. एकीकडे मोदी समर्थक मोदीचं नाव जाहीर झाल्यामुळे जल्लोष साजरा करत आहे तर दुसरीकडे अडवाणींच्या नाराजीवर चिंता व्यक्त केली जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या