नवी दिल्ली, 21 ऑक्टोबर : उत्तर प्रदेशातील देवरिया येथील एका खेडेगावातील मुलाला चित्रपट सृष्टीत करिअर करायचे होते. पण त्याच्याकडे कोर्स फीसाठी पैसे नव्हते. त्यानंतर त्याने शिष्यवृत्तीद्वारे अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले. परंतु, अभियंता होण्यास नकार दिला. आज हा मुलगा एक प्रसिद्ध Youtube क्रिएटर बनला आहे. सतीश कुशवाह असे या मुलाचे नाव आहे. 28 वर्षीय सतीश कुशवाहाच्या Satish K Videos चे यूट्यूब चॅनलचे 11 लाखांहून अधिक सदस्य आहेत. त्याच्या चॅनलवर तो ऑनलाइन कमाई करण्याचे मार्ग सांगतो. तसेच इतर यशस्वी YouTubers च्या प्रेरणादायी मुलाखती देखील दाखवतात. युट्युबच्या यशामुळे त्यांनी वयाच्या 25 व्या वर्षी मुंबईसारख्या महागड्या शहरात फ्लॅटही खरेदी केला. सतीश कुशवाह सांगतात की, सध्या फक्त युट्युब अॅडसेन्समधून ते एका महिन्यात सरासरी 5 ते 8 लाख रुपये कमावतात. यामध्ये ब्रँड प्रमोशन, एफिलिएट मार्केटिंग इत्यादींची कमाई जोडल्यास त्यांचे उत्पन्न एका महिन्यात 10 ते 12 लाख रुपयांपर्यंत पोहोचते. सतीश कुशवाह यांनी गेल्या 6 महिन्यांत Youtube Adsense मधून सुमारे 40 लाख रुपये (सुमारे 50 हजार डॉलर) कमावले आहेत. Youtube मधून होणारी कमाई फक्त अॅडसेन्समध्ये डॉलरमध्ये येते. त्याच वेळी, स्वतंत्र सोशल मीडिया अॅनालिटिक्स वेबसाइट socialblade.com चा अंदाज आहे की Satish K Videos चॅनेलवरून, दरमहा 1.5 लाख ते 22 लाख रुपये कमाई करणे शक्य आहे.
असा राहिला प्रवास - सतीश सांगतात की, चाळीत एकच खोली त्यांच्यासाठी आणि इतर 5 लोकांसाठी किचन, बेडरूम आणि लिव्हिंग रूम होती. आवाजामुळे खराब आवाज रेकॉर्ड होऊ नये म्हणून रेकॉर्डिंगच्या वेळी खोलीतील पंखा बंद ठेवावा लागला. त्यामुळे उन्हाळ्यात त्यांना गरमीमुळे खूप त्रास व्हायचा. सतीश सांगतात की, त्यांना लहानपणापासूनच चित्रपट निर्मितीची आवड होती. कोणाचा फोन मिळायचा तर ते व्हिडीओ बनवायला सुरुवात करायचे. ते पडद्यामागील बरेच चित्रपट पाहत असे आणि मोठे झाल्यावर त्यांना चित्रपट निर्माता बनायचे होते. जेव्हा त्यांनी घरातील सदस्यांना सांगितले की, मला फिल्ममेकिंग मध्ये जायचे आहे, तेव्हा सुरुवातीला ते काय आहे ते त्यांना समजले नाही. मग समाजात काही ‘सन्मान’ मिळवून देणार्या अशाच कोर्समध्ये ग्रॅज्युएशन करायचं त्यांनी ठरवलं. सुरुवातीला ते यूट्यूबवर असे व्हिडिओ पाहत असे, ज्यामुळे त्यांना चित्रपट सृष्टीची माहिती मिळायची. त्यानंतर त्यांच्या मित्राने सांगितले की, यूट्यूबवरून तुम्ही व्हिडिओ बनवून पैसे कमवू शकता. दरम्यान, 2015 मध्ये सतीशने ब्लॉगिंगही सुरू केले. पण त्यातून कमाई करणे सोपे नव्हते. ब्लॉगिंगमधून पहिले 100 डॉलर्स कमवायला दीड वर्ष लागले. हेही वाचा - UPSC क्लिअर होताच गर्लफ्रेंडने दाखवला इंगा; 5 वेळा परीक्षा दिलेला प्रियकर रस्त्यावर आला अन् चाळीतील एक रुम ते स्वत:च्या 1BHK पर्यंतचा प्रवास मुंबईत चाळीत राहायला लागल्यानंतर 3 वर्षांनी वयाच्या 25व्या वर्षी त्यांनी मुंबईत घर विकत घेतले. हे घर लहान आहे, 1BHK पण स्वतःचे आहे. ऑनलाईन व्यवसायातून एवढ्या झपाट्याने प्रगती केल्यानंतर त्यांनी घर कसे विकत घेतले? याबद्दल ते सांगतात की, त्यांचे रूममेट्ससोबत भांडण झाले. आणि मुंबईत, बॅचलर्सना भाड्याने घर मिळण्यास त्रास होतो. या कारणास्तव त्यांनी एकेकाळी घर घेण्याचे ध्येय ठेवले होते. यानंतर एका वर्षानंतर 2019मध्ये ते नवीन घरात राहायला गेले. सतीशच्या यूट्यूब चॅनलवर 11 लाखांहून अधिक सबस्क्राइबर्स आहेत. जेव्हा त्यांनी यूट्यूबवर आला तेव्हा फक्त एक लाख सबस्क्राइबर्स पूर्ण करण्याचा विचार केला. त्यानंतर प्रवास सुरूच राहिला.व्हिडीओच्या माध्यमातून त्यांनी लोकांच्या काही समस्या सोडवण्याचाही प्रयत्न केला. सतीश असेही सांगतात की, काही लोकांनी त्याचे चॅनल पाहिल्यानंतर व्हिडिओ बनवायला सुरुवात केली आणि आता ते त्याच्यापेक्षा जास्त कमाई करत आहेत. कोरोनामध्ये नोकरी गमावल्यानंतर अशा काही लोकांनी 2020मध्ये यूट्यूबवर काम करण्यास सुरुवात केली. सतीश यांच्याशिवाय 3 लोक त्यांच्या चॅनलसाठी पूर्णवेळ काम करतात. तर 4 इतर फ्रीलांसर देखील त्यांच्यासाठी काम करतात. सतीश सांगतात की, ते त्यांच्या सहकाऱ्यांना पगार देण्यासाठी महिन्याला सुमारे दीड लाख रुपये खर्च करतो, अशी माहितीही त्यांनी दिली.