JOIN US
मराठी बातम्या / देश / 'आधी तू मला मार म्हणत स्वत:च्याच लगावली कानशिलात'; BJP मंत्र्याचा तो VIDEO होतोय व्हायरल

'आधी तू मला मार म्हणत स्वत:च्याच लगावली कानशिलात'; BJP मंत्र्याचा तो VIDEO होतोय व्हायरल

मंत्र्यांचा हा व्हिडीओ पाहून विविध प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

ग्वाल्हेर, 13 जानेवारी : मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh News) शिवराज सिंह चौहान यांच्या सरकारमधील मंत्र्यांचा एक व्हिडीओ (Video Viral) सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भाजी मार्केटमध्ये कारवाई केल्यानंतर येथील विक्रेत्यांनी मंत्र्याविरोधात संताप व्यक्त केला. यावेळी ऊर्जा मंत्री प्रद्युम्न सिंह तोमर यांच्यावरही महिलेने संताप व्यक्त केला. दुकान हटवण्यासाठी मारहाण केल्याचा आरोपही महिलेने यावेळी केला. (Madhya Pradesh BJP minister is going viral) यानंतर मंत्र्यांनी मात्र वेगळ्याच शैलीत महिलेशी संवाद साधला. त्यांनी महिलेच्या हाताने स्वत:च्या कानशिलात लगावून घेतली. यावेळी ते महिलेसमोर म्हणाले की, मी तुझा मुलगा आहे. आधी तू मला मारून घे मग मी तुझं म्हणणं ऐकेन. असं म्हणून मंत्र्यांनी महिलेचे हात घेऊन स्वत:च्या कानशिलात लगावून घेतली. यानंतर कुठे जाऊन महिलेचा राग शांत झाला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेकांनी या व्हिडीओमध्ये मंत्र्यांची डायलॉगबाजी सुरू असल्याचं म्हटलं आहे. हे ही वाचा- युपीत भाजपला धक्क्यावर धक्के, 14 वा मोठा झटका, मंत्री धर्म सिंह सैनींचा राजीनामा

हजारी भाजी मार्केटमधील महिला बबीना यांचं दुकान हटविण्यात आलं होतं, हे भाजी मार्केट दुसऱ्या एका मैदानात शिफ्ट करण्यात आलं आहे. त्यावेळी येथील दुकानदारांनी संताप व्यक्त केला होता.

यासंबंधित आणखी एक व्हिडीओदेखील समोर आला असून यात मंत्री महिलेला नमस्कार करीत असल्याचं दिसत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या