JOIN US
मराठी बातम्या / देश / लसीचे 100 कोटी डोस पूर्ण होताच लाल किल्ल्यावर जंगी सोहळा, फडकणार जगातील सर्वात उंच झेंडा

लसीचे 100 कोटी डोस पूर्ण होताच लाल किल्ल्यावर जंगी सोहळा, फडकणार जगातील सर्वात उंच झेंडा

देशात कोरोना (World’s biggest flat will be furled on Red Fort on completion of 100 cr vaccination) लसीचे 100 कोटी डोस पूर्ण होत असल्याच्या निमित्तानं लाल किल्ल्यावर जंगी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 20 ऑक्टोबर : देशात कोरोना (World’s biggest flat will be furled on Red Fort on completion of 100 cr vaccination) लसीचे 100 कोटी डोस पूर्ण होत असल्याच्या निमित्तानं लाल किल्ल्यावर जंगी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. 100 कोटी लसींचा ऐतिहासिक टप्पा पार केल्याच्या आनंदाप्रित्यर्थ दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्यावर जगातील सर्वात (World’s biggest flag) उंच झेंडा फडकावला जाणार आहे. गुरुवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमाराला या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. असा आहे झेंडा हा झेंडा 225 फूट उंच आहे. याची रुंदी आहे तब्बल 150 फूट. या भव्यदिव्य झेंड्याचं वजन आहे 1400 किलो. भारतातील स्वदेशी खादीपासून हाताने विणकाम करून हा झेंडा तयार करण्यात आला आहे. या झेंड्याचं क्षेत्रफळ 37 हजार 500 स्क्वेअर फूट एवढं आहे. या झेंड्यासाठी 4600 मीटर सुती कापडाचा वापर करण्यात आला आहे. एकूण 70 जणांनी मिळून हा झेंडा तयार केला असून या कामासाठी 49 दिवस अहोरात्र काम सुरू होतं. लसीकरणाला वेग भारतात 16 जानेवारीपासून लसीकरणाला औपचारिकरित्या सुरुवात झाली होती. त्यानंतरच्या काही महिन्यात लसीच्या पुरवठ्याअभावी वेगाला खिळ बसली होती. मात्र गेल्या काही महिन्यांपासून पुन्हा एकदा देशातील लसीकरणाने वेग घेतला असून 99 कोटी लसीकरणाचा टप्पा पार केला आहे. ज्या क्षणी 100 कोटी लसीकरण पूर्ण होईल, त्या क्षणी देशभरात याची घोषणा केली जाणार आहे. विमानतळ, रेल्वे स्थानक, बस स्थानक आणि इतर अनेक सार्वजनिक ठिकाणी लसीकरणाचा ऐतिहासिक टप्पा पूर्ण झाल्याची घोषणा केली जाणार आहे. स्पाईसजेट लावणार पोस्टर लसीकरणाचा 100 कोटींचा टप्पा पार केल्यानंतर स्पाईस जेट 100 कोटींचं पोस्टर आपल्या विमानांवर लावणार असून त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचा फोटोही असणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मंडविया यांनी ही माहिती दिली आहे. 100 कोटी लसीकरणाचा टप्पा साजरा करण्यासाठी इतरही अनेक कार्यक्रमांचं आय़ोजन सरकारी पातळीवर करण्यात आलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या