कोलकाता, 2 मे : पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचा निकाल अखेर सर्वांसमोर आला आहे. बंगालचा गड राखण्यात पुन्हा एकदा ममता बॅनर्जी यांना यश मिळालं आहे. दरम्यान नंदीग्राम विधानसभा मतदारसंघात मात्र त्यांना अपयशाचा सामना कारावा लागला. असं असलं तरी पश्चिम बंगालमध्ये एका महिला उमेदवाराची मोठी चर्चा सुरू आहे. या महिलेने गाडीशिवाय…पैशांशिवाय प्रचार केला. आणि चांगली बाब म्हणजे यात त्यांना यशही मिळालं. बंगालमधील सलोतरा येथील एका लहानशा झोपडीत राहणाऱ्या मनरेगा श्रमिक भाजप उमेदवार चंदना बाउरी यांच्या यशाचं देशभरातून कौतुक केलं जात आहे. त्यांच्याजवळ तीन गाय, तीन बकरी, एक झोपडी अशी अवघी 32 हजार रुपयांची संपत्ती आहे. काय म्हणाले होती पीएम मोदी? मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालमधील बांगुरामध्ये एका जनसभेचं आयोजन केलं होतं. यावेळी त्यांनी बांकुरामधील सालतोरा मतदारसंघातून भाजप उमेदवार चंदना बाऊरी यांचं नाव घेतलं होतं. आणि ममता बॅनर्जी यांना आव्हान दिलं होतं. यावेळी मोदी म्हणाले होते की, चंदना बाउरी बंगालमधील महिलांच्या आकांक्षेचं चित्र आहे.
हे ही वाचा- नंदीग्रामध्ये सुपर ओव्हरचा थरार! शेवटच्या क्षणापर्यंत असा रंगला सामना कोण आहेत चंदना बाऊरी? भाजपने बांकुरा जिल्ह्यातील सालतोरा विधानसभा जागेवरुन चंदना बाउरी यांचा उमेदवारी दिली होती. चंदना या अत्यंत गरीब कुटुंबातून आल्या आहे. एडीआरच्या रिपोर्टनुसार चंदना बाउरी पश्चिम बंगालमधील सर्वात गरीब उमेदवारांमधील एक आहेत. उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी चंदनाला मी जिंकू शकेल का, याबाबत भीती होती. मात्र अनेकजण तिच्या पाठीशी उभं असल्यांच तिने ANI शी बोलताना सांगितलं होतं.