पटना 12 मार्च : बिहारच्या मुजफ्फरपूरमध्ये एका गर्भवती महिलेनं डॉक्टरविरोधात ग्राहक मंचमध्ये गुन्हा दाखल केला आहे. महिलेनं जिल्ह्यातील मोतीपूर पीएचसीमध्ये नसबंदी (Female Sterilization) करून घेतली होती. मात्र, यानंतरही संबंधित महिला गर्भवती राहिली (Woman Pregnant After Sterilization). आता महिलेनं ग्राहक न्यायालयात ११ लाख रुपये नुकसानभरपाईची मागणी केली आहे. यावर १६ मार्चला सुनावणी होणार आहे. याप्रकरणी महिलेनं आरोग्य विभागातील प्रधान सचिवाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मोतीपूर ब्लॉक अंतर्गत शासकीय रुग्णालयात कुटुंब नियोजन कार्यक्रमाचा एक भाग म्हणून फुलकुमारी यांनी 27 जुलै 2019 रोजी नसबंदी केली. यावेळी त्यांनी सरकारने दिलेल्या सर्व सूचनांचे पालन केले. या महिलेनं सांगितलं, की तिला आधीच चार मुलं आहेत, ज्यांचा खर्च करणं तिच्या कुटुंबासाठी अशक्य आहे. कौटुंबिक नियोजनासाठी हे ऑपरेशन पूर्ण करूनही, ती दोन वर्षानंतर पाचव्या वेळी गर्भवती झाली आहे. अशा परिस्थितीत त्यांची आर्थिक परिस्थिती या मुलाचे संगोपन करायचं कसं, असा प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित करत आहे. याप्रकरणी महिलेचे वकील असलेल्या एस.के.झा यांनी सांगितलं, की महिला अत्यंत गरीब कुटुंबातील आहे. आपल्या आधीच्या ४ मुलांचं संगोपन करण्यासही ती आर्थिकदृष्ट्या सक्षम नाही. अशात ती आता पुन्हा एकदा गर्भवती झाली आहे. यातून निकृष्ट सरकारी प्रणाली दिसून येते. याप्रकरणी जिल्हा ग्राहक आयोगात दावा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील सुनावणीची तारीख 16 मार्च निश्चित करण्यात आली आहे. याप्रकरणी आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांव्यतिरिक्त अन्य तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या महिलेच्या म्हणण्यानुसार, तिनं नसबंदी करून घेतली मात्र आहे दोन वर्षानंतर ती पुन्हा गरोदर राहिल्यानं कुटुंबात निराशा आहे. जेव्हा तिनं याबाबत मोतीपूर रूग्णालयात तक्रार केली तेव्हा अल्ट्रासाऊंड करण्यात आलं. ज्यामध्ये ती गरोदर असल्याची खात्री झाली. यानंतर महिला स्वतःच हैराण झाली.