JOIN US
मराठी बातम्या / देश / शोलेतील जय-वीरुची मैत्री का तुटली? इंटनेटवर VIDEO VIRAL

शोलेतील जय-वीरुची मैत्री का तुटली? इंटनेटवर VIDEO VIRAL

उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर (Twitter) हँडलवर एक नावीन्यपूर्ण व्हिडीओ (VIDEO) शेअर केला आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 28 जानेवारी :  रमेश सिप्पी यांचा शोले (Sholay)  हा सिनेमा भारतीय चित्रपटसृष्टीतील एक मैलाचा दगड आहे. 15 ऑगस्ट 1945 रोजी हा सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. त्यानंतर तो कित्येक आठवडे हाऊसफुल्ल होता. आज साडे चार दशकांनतरही ‘शोले’ची जादू कमी झालेली नाही. शोलेतील प्रसंग, शोलेतील मारामारी, जय, वीरु, ठाकूर बसंती आणि गब्बर ही प्रमुख पात्रं आजही सर्वांच्या लक्षात आहेत. त्याचबरोबर या सिनेमातील अगदी लहान भूमिका असलेलं पात्रंही तितकंच लोकप्रिय आहे. शोलेच्या या लोकप्रियतेचा आधार घेऊन अनेक पुस्तकं लिहण्यात आली. माहितीपट निघाले. वेगवेगळ्या जाहिरातींमध्येही शोलेतील प्रसंगांचा आधार घेतला जातो. उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) सध्या रस्ता सुरक्षा अभियान (Road Safety Campaign) सुरु आहे. उत्तर प्रदेश पोलिसांसह (UP Police) सर्वच सरकारी विभाग हे अभियान यशस्वी होण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत. रस्ते अपघातांबद्दल जागृती, सुरक्षा नियमांबद्दल जागृतीसाठी हे अभियान सुरु आहे. याच अभियनाचा भाग म्हणून उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर (Twitter) हँडलवर एक नावीन्यपूर्ण व्हिडीओ (VIDEO) शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ‘शोले’ या सिनेमातील ये दोस्ती हम नहीं छोड़ेंगे’ या गाण्याचं क्लिपिंग वापरण्यात आलं आहे.

संबंधित बातम्या

#UPPKeSholay असं कॅप्शन देऊन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. त्याचबरोबर जय आणि वीरुची मैत्री का तुटली असा प्रश्न या व्हिडीओमध्ये विचारण्यात आला आहे. बाईकवर स्टंट करणं हे जीवघेणं ठरु शकतं. त्यामुळे मैत्री आणि आयुष्य दोन्हीही वाचणार नाही. गाडी चालवताना स्टंट करणं हा गुन्हा आहे, असा संदेश या व्हिडीओमध्ये देण्यात आला आहे. 20 फेब्रुवारीपर्यंत अभियान उत्तर प्रदेश पोलिसांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. उत्तर प्रदेशातील रस्ता सुरक्षा अभियान 21 जानेवारी रोजी सुरु झालं असून ते 20 फेब्रुवारीपर्यत राबवण्यात येणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या