JOIN US
मराठी बातम्या / देश / West Bengal Election 2021: भाजप अॅक्शन मोडमध्ये, पहिल्या दोन टप्प्यातील मतदानाआधी पंतप्रधान घेणार 4 रॅली

West Bengal Election 2021: भाजप अॅक्शन मोडमध्ये, पहिल्या दोन टप्प्यातील मतदानाआधी पंतप्रधान घेणार 4 रॅली

निवडणुकीपूर्वी (West Bengal Election 2021) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Rally of PM Narendra Modi) बंगालमध्ये चार मोठ्या रॅली करणार आहेत. या कार्यक्रमाला 14 मार्चपासून सुरुवात होण्याची शक्यता आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

कोलकाता 12 मार्च : पश्चिम बंगालमधील निवडणुकांना (West Bengal Election 2021) काहीच दिवस शिल्लक आहेत. अशात भाजप विजयासाठी कंबर कसून प्रयत्न करत असल्याचं दिसत आहे. अशातच आता अशी माहिती समोर आली आहे, की पंतप्रधान नरेंद्र मोदी (Rally of PM Narendra Modi)बंगालमध्ये चार मोठ्या रॅली करणार आहेत. या कार्यक्रमाला 14 मार्चपासून सुरुवात होण्याची शक्यता आहे. विशेष बाब म्हणजे भाजप सुरुवातीच्या दोन टप्प्यात म्हणजेच २७ आणि १ एप्रिलला अधिक चांगल्या परिणामांच्या प्रयत्नात आहे. विशेष बाब ही आहे की पहिल्या दोन टप्प्यात सामील असलेले अधिकतर भाग हे जगनमहल क्षेत्र आणि शुभेंदु अधिकारी यांच्या क्षेत्रातील आहे. या भागांमध्ये भाजपनं २०१९ मध्ये जोरदार प्रदर्शन केलं होतं. पहिल्या टप्प्यात ५ जिल्हे आणि ३० जागांसाठी मतदान होणार आहे. या जिल्ह्यांमध्ये पुरुलिया, पश्चिमी मेदिनीपूर पार्ट -१, बांकुर पार्ट, पूर्व मेगिनीपुर पार्ट १ आणि झारग्राम यांचा समावेश आहे. दुसऱ्या टप्प्यात ४ जिल्हे आणि ३० जागांसाठी मतदान होणार आहे. यात बांकुरा पार्ट-2, पूर्व मेदिनीपुर पार्ट-2, पश्चिम मेदिनीपुर पार्ट-2 आणि दक्षिण 24 परगना पार्ट-1 सामील आहे. भाजपचे बंगाल अध्यक्ष दिलीप घोष यांनी सांगितलं, की पंतप्रधान पुरुलिया, खडगपुर, बांकुरा आणि कोंटाई या चार ठिकाणी सभा घेतील. या रॅली १० दिवसात पूर्ण होणार असून लवकरच याच अंतिम वेळापत्रकाचीही घोषणा केली जाईल, असंही घोष म्हणाले. घोष यांना विचारलं गेलं, की ते खडगपूरच्या जागेवरुन निवडणूक का लढवत नाहीत. तेव्हा ते म्हणाले, की त्यांना मेदिनीपूरमधून खासदारच्या जागेसाठी लक्ष केंद्रीत करायचं आहे. तसंच ते म्हणाले, की भाजपमध्ये उमेदवारांची निवड केंद्रीय नेतृत्वातून केली जाते. माझ्या बाबतीतही हा निर्णय त्यांनीच घेतला, की मी खडगपूरच्या जागेसाठी निवडणूक नाही लढवायला पाहिजे आणि मला वाटतं हा चांगला निर्णय आहे, असंही घोष म्हणाले. घोष यांनी २०१६ मध्ये खडगपूरमध्ये विजय मिळवला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या