सोनिया गांधी (File Photo)
नवी दिल्ली, 5 एप्रिल : मंगळवारी काँग्रेसच्या संसदीय मंडळाची बैठक झाली. (Congress Parliamentary Board Meeting) यात काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी (Congress President Sonia Gandhi) यांनी आगामी काळात अनेक महत्त्वपूर्ण बदल करण्याचे संकेत दिले. तसेच काँग्रेसच्या कार्यकारणीची बैठक घेण्याबाबतही सांगितले. संसदीय मंडळाच्या या बैठकीत माजी पंतप्रधान मनमोहनसिंह (Former PM Manmohansingh) आणि काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) उपस्थित होते. G-23 मधील बंडखोर नेत्यांना इशारा - संसदीय मंडळाच्या बैठकीत सोनिया गांधी म्हणाल्या की, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाचा झालेला पराभवामुळे तुम्ही सर्वजण किती निराश आहात, याबाबत मला कल्पना आहे. पक्षाचा पराभव हा आश्चर्यकारक आणि त्रासदायक राहिला. याच परिस्थितीत काँग्रेस पक्षाला पुन्हा भरारी घेण्यासाठी अनेक कडक निर्णय घेण्याची मागणी करणाऱ्या G-23 मधील बंडखोर नेत्यांना त्यांनी सांगितले की, पक्षाला पुन्हा मजबूत करण्यासाठी त्यांना अनेक सल्ले मिळत आहेत. तसेच ते यावर काम करत आहेत. काँग्रेसकडून चिंतन शिबिराचे आयोजन - नुकत्याच उत्तरप्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल लागला. निकालात या पाचही राज्यांत काँग्रेसचा दारुण पराभव झाला. यानंतर काँग्रेस कार्यकारिणीची बैठक झाली. या बैठकीत चिंतन शिबिराचे आयोजन करण्याचा विचार समोर आला होता. याबाबत सोनिया गांधी यांचे असे मत आहे की, चिंतन शिबिर एक अशी जागा आहे जिथे मोठ्या प्रमाणात काँग्रेस पक्षाच्या लोकांचे विचार ऐकले जातील. हे विचार पक्षाला पुढे घेऊन जाण्यात योगदान देतील. तसेच पक्ष सध्या ज्या संकटांचा सामना करत आहे, त्यावर कशा प्रकारे मात करावी, याबाबतही ते सांगतील. नितीन गडकरींच्या भेटीमुळे मनसे-भाजप युती होईल का? संजय राऊत म्हणाले… मंगळवारी आयोजित काँग्रेसच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत सोनिया गांधी म्हणाल्या की, आगामी काळातील प्रवास कठीण होणार आहे. मात्र, आपल्याला केवळ आपल्यासाठीच नाही तर लोकशाही आणि समाजासाठी पुन्हा आपल्या जुन्या स्वरुपात परत येणे फार गरजेचे आहे. G-23 नेत्यांमध्ये कोण?
तर जितिन प्रसाद और योगानंद शास्त्री यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे.