JOIN US
मराठी बातम्या / देश / विद्युत खांबातून अचानक वाहू लागलं पाणी; VIDEO पाहून तुम्हालाही बसेल धक्का

विद्युत खांबातून अचानक वाहू लागलं पाणी; VIDEO पाहून तुम्हालाही बसेल धक्का

एका विजेच्या खांबातून चक्क पाणी वाहायला सुरू झालं (suddenly Water flow from electric pole) आहे. या विद्युत खांबावर कोणत्याही प्रकारची पाण्याची नळी नसताना, या विजेच्या उंच खांबातून पाणी कसं काय वाहत आहे, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

कानपूर, 12 मार्च: जगाच्या कानाकोपऱ्यातून अनेकदा अशा काही घटना समोर येतात, ज्याचं उत्तर विज्ञानाकडेही मिळत नाही. अशीच एक घटना उत्तर प्रदेशातील कानपूर येथे समोर आली आहे. या घटनेनंतर परिसरात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. येथील एका विजेच्या खांबातून चक्क पाणी वाहायला सुरू झालं आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात चांगलाच व्हायरल होतं असून विजेच्या खांबातून वाहणारं पाणी पाहाण्यासाठी लोकांनी गर्दी केली आहे. कोणत्याही प्रकारची नळी नसताना, या विजेच्या उंच खांबातून पाणी कसं काय पडत आहे, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. (suddenly Water flow from electric pole) मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित घटना कानपूरच्या साकेत नगर येथील आहे. येथील पोलीस स्टेशनच्या  बाहेर लावण्यात आलेल्या विजेच्या खांबातून अचानक पाणी वाहू लागलं आहे. या घटनेची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरली असून गावकऱ्यांनी विजेच्या खांबातून वाहणारं पाणी पाहण्यासाठी चांगलीच गर्दी केली आहे. या विजेच्या खांबातून खूप वेळ पाणी निघताना पाहून लोकांनी याचा व्हिडीओ बनवला आहे. जो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

एवढंच नव्हे, तर घटनास्थळी आलेल्या पोलिसांनी देखील याचा व्हिडीओ काढला आहे. या व्हायरल व्हिडीओमुळे संपूर्ण कानपूरमध्ये संबंधित घटनेची जोरात चर्चा सुरू आहे. पण खांबातून रात्री उशीरापर्यंत सुरू असलेलं पाणी कालांतराने आपोआप बंद झालं आहे. (वाचा - VIDEO: मुंबईत स्फोटकं सापडली त्या गाडीच्या मालकाचा खाडीत सापडला मृतदेह ) अलिगडमध्येही असंच एक प्रकरण समोर आलं आहे मागील वर्षी अलिगडमध्येही असाच प्रकार समोर आला होता. येथील एका विद्युत खांबावरून अचानक पाणी आल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. तेव्हाही संबंधित घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात चर्चेचा विषय ठरला होता. वीज आणि पाणी एकत्र वाहत असल्याने विद्युतप्रवाहाचा धक्का बसण्याची भीती लोकांमध्ये पसरली होती. याची माहिती महानगरपालिका आणि वीज विभागाला देण्यात आली असता, संपूर्ण टीम घटनास्थळी पोहोचली आणि त्यांनी पाहणी केली होती. यावेळी पथकाला असं आढळलं की, या विजेच्या खांबावरून पाण्याची एक जुनी पाइनलाईन गेली होती. जी कुजल्यामुळे त्यातील पाणी गळायला सुरुवात झाली होती. पण या ताज्या घटनेचं असं कोणतही कारण अद्याप समोर आलं नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या