JOIN US
मराठी बातम्या / देश / विधान परिषदेत काँग्रेसचा तुफान राडा; उपाध्यक्षांनाच खुर्चीवरून खाली खेचलं पाहा LIVE VIDEO

विधान परिषदेत काँग्रेसचा तुफान राडा; उपाध्यक्षांनाच खुर्चीवरून खाली खेचलं पाहा LIVE VIDEO

कर्नाटक विधान परिषदेत (Karnataka legislative concil) काँग्रेसच्या आमदारांनी (Congress MLC) मंगळवारी तुफान राडा केला.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

बंगळुरू, 15 डिसेंबर : कर्नाटक विधान परिषदेत (Karnataka legislative concil) काँग्रेसच्या आमदारांनी (Congress MLC) मंगळवारी तुफान राडा केला. सभापतींच्या खुर्चीत असलेल्या उपाध्यक्षांनाच थेट खाली खेचण्याएवढा दंगा सभागृहात झाला. या गोंधळाचा VIDEO सुद्धा सोशल मीडियावर आता फिरत आहे. हा प्रकार अत्यंत लज्जास्पद असल्याची प्रतिक्रिया भाजपने दिली आहे. मंगळवारी सकाळी सभागृहाचं कामकाज सुरू झाल्यानंतर लगेचच काँग्रेस सदस्यांनी गोंधळाला सुरुवात केली. विधानपरिषदेचे उपाध्यक्ष सभापतींच्या खुर्चीत स्थानापन्न झाल्यावर काँग्रेस आमदारांनी यावर आक्षेप घेतला. त्यांनी या खुर्चीवर बसणं घटनाबाह्य असल्याचा त्यांचा दावा होता.

संबंधित बातम्या

यावरून सुरू झालेला गोंधळ शिगेला पोहोचला. सभापतींच्या खुर्चीजवळ येऊन सदस्यांनी गोंधळ सुरू केला आणि अक्षरशः उपाध्यक्षांना खाली खेचलं. शेवटी सभागृहात तैनात असलेल्या मार्शल्सना मध्ये पडत त्यांना सावरावं लागलं. उपमुख्यमंत्री अश्वथनारायण आणि काँग्रेसचे आमदार यांच्यात सुरू झालेल्या वादावादीचं रुपांतर या अभूतपूर्व गोंधळात झालं. कर्नाटक सरकारने मांडलेल्या गोवंशहत्या बंदी विधेयकाला विरोध करण्यासाठी काँग्रेसने आपल्या सर्व सदस्यांसाठी व्हिप काढलं होतं. सर्व आमदारांनी सभागृहात उपस्थित राहावं, असं काँग्रेसचं व्हिप होतं. अशा भरगच्च सभागृहात हा राडा झाला. काँग्रेसने विधेयकाला विरोध करायचं ठरवलं आहे. पण काँग्रेसचे मित्र असलेल्या JDS ने विधेयक संमत करण्यापूर्वी समितीकडे पाठवण्याचा आग्रह धरला आहे. “विधान परिषदेतला हा गोंधळ आणि राडा पाहून जनता आमच्याबद्दल काय विचार करत असेल असं मनात येतं. हे सगळं पाहताना व्यथित झालो आहे. उपाध्यक्षक्षांना खुर्चीवरून खाली खेचणं अत्यंत लज्जास्पद आहे. कर्नाटक विधान परिषदेच्या इतिहासात असा लज्जास्पद दिवस कधी पाहिला नव्हता”, अशा शब्दांत भाजपचे आमदार लेहरसिंह सिरोया यांनी प्रतिक्रिया दिल्याचं इंडिया टुडेने म्हटलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या