नवी दिल्ली, 08 जुलै : बँकमध्ये डाका टाकल्याचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. ‘बेबी ड्राइवर’ हा हॉलीवुड सिनेमा पाहिल्यानंतर बँक लुटण्याचा प्रयत्न केल्याची माहिती देण्यात आली आहे. भरदिवसा कोटक महिंद्रा बँकेमध्ये शस्त्रांचा वापर करत धाड टाकली. पण सुरक्षा रक्षकाच्या सर्तकतेमुळे बँकेचं मोठं नुकसना टळलं. पण त्यानंतर चोरट्यांनी मात्र तिथून पळ काढला. या प्रकरणात पोलिसांनी उद्योगपती प्रभजोत आणि सुखदेव आशा दोघांना ताब्यात घेतलं आहे.