JOIN US
मराठी बातम्या / देश / घर आवरताना सापडली आजोबांची डायरी, कुतुहल म्हणून उघडलं अन् मिळाली गांधी-नेहरू आणि आंबेडकरांची स्वाक्षरी

घर आवरताना सापडली आजोबांची डायरी, कुतुहल म्हणून उघडलं अन् मिळाली गांधी-नेहरू आणि आंबेडकरांची स्वाक्षरी

आईसोबत घर आवरताना मिळाली आजोबांची डायरी, कुतुहल म्हणून उघडलं आणि निघालं….

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 10 डिसेंबर : बऱ्याच दिवसांनंतर आपण घराची सफासफाई करतो तेव्हा अनेक जुन्या-नव्या किंवा काही वेळा तर माहीत नसलेल्या किंवा विसलेल्या गोष्टी आपल्याला सापडत असतात. काही वेळा अनपेक्षित आणि अमूल्य ठेवाच आपल्या हातात लागतो ज्याची आपण कल्पनाही केलेली नसते. असाच एका तरुणाच्या बाबतीत घडलं आहे. आईसोबत घराची आवराआवर करत असताना काही जुन्या वस्तू सापडल्या. त्यामध्ये आजोबांची जुनी डायरी देखील होती. या जुन्या डायरीत काय असेल याचं कुतुहल तर या तरुणाला होतंच. डायरी उघडताच ज्याची कल्पनाही आपण करू शकत नाही अशा गोष्टी समोर आल्या आणि हा तरुण आवाक झाला. या डायरीमध्ये हात्मा गांधी, पं. जवाहरलाल नेहरू, डॉ. भीमराव आंबेडकर आणि सी.व्ही. रमण यांच्यासारख्या अनेक महान व्यक्तींच्या स्वाक्षऱ्या अगदी तारखेसह नमूद केल्या होत्या. अगदी दुर्मीळ असलेला हा संग्रह आणि अमूल्य ठेवा या तरुणाला मिळाला.

संबंधित बातम्या

जाहिरात
जाहिरात

हे वाचा- अजब प्रथा! हसत हसत या महिला का खातात चाबकाचे फटके? पहिला फोटो पाहिला तर दिसेल की महात्मा गांधीजी यांची स्वाक्षरी आहे. महात्मा गांधींची ही सही 25 फेब्रुवारी 1938 रोजी करण्यात आली असं या फोटोत पाहून तरी दिसतं आहे. दुसऱ्या फोटोमध्ये जवाहरलाल नेहरू यांची स्वाक्षरी 10 फेब्रुवारी 1937 रोजी करण्यात आल्याचं या फोटोमध्ये दिसत आहे. विजय बसरूर यांनी याबाबत ट्वीटरवर माहिती शेअर केली आहे. आईसोबत घर आवरत असताना मला आजोबांची एक जुनी डायरी सापडली आणि त्यामध्ये काय असेल या कुतुहलापोटी उघडली त्यातून असं काही निघेल याची पुसटशी कल्पनादेखील आम्हा कुणालाच नव्हती. या डायरीमध्ये महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि सी.व्ही. रमण यांच्या सह्या आहेत असं विजय यांनी कॅप्शन लिहून सह्यांचे फोटो देखील पोस्ट केले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या