छिंदवाडा, 14 जुलै : धर्मनिरपेक्षतेचा उच्चार दररोज केला जात असला, तरी धर्म हा राजकारणातला महत्त्वाचा घटक आहे, याची प्रचीती वेळोवेळी येत असते. नुकत्याच व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमुळे हे पुन्हा एकदा दिसून आलं आहे. काँग्रेस छिंदवाडाचे (मध्य प्रदेश) खासदार आणि राजस्थानचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांचे पुत्र नकुलनाथ (Nakulnath) यांचा हा व्हिडीओ आहे. त्या व्हिडीओत नकुलनाथ एका रॅलीमध्ये आपल्या कपाळावरचा टिळा पुसताना दिसत आहेत. त्यावरून भारतीय जनता पक्षाच्या (BJP) नेत्यांकडून नकुलनाथ यांच्यावर टीका होत आहे. ‘लाइव्ह हिंदुस्तान’ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे. काँग्रेसचे खासदार नकुलनाथ अलीकडेच छिंदवाडामधल्या (Chhindwada) परासिया येथे पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात रोड शोमध्ये सहभागी झाले होते. त्या वेळी नकुलनाथ यांच्या कपाळावर टिळा लावलेला होता, असं दिसत होतं; मात्र रोड शो सुरू असताना मध्येच त्यांनी हा टिळा पुसून टाकला. भारतीयांनो सावध व्हा! कोरोनाचा नवा व्हेरिएंट अधिक धोकादायक, चौथ्या लाटेची भीती या व्हिडीओत असं दिसत आहे, की नकुलनाथ आपल्या कार्यकर्त्यांसह एका गाडीवर उभे राहिले आहेत आणि नागरिकांना अभिवादन करत आहेत. ते करतानाच मध्येच बाजूच्या कार्यकर्त्यांपैकी कोणी तरी त्यांच्यापुढे टिश्यू पेपर्सचा बॉक्स ठेवताना दिसतं. त्या बॉक्समधला टिश्यू पेपर घेऊन नकुलनाथ टिळा पुसतात. तेवढ्यात कॅमेराचा अँगल बदलतो. काही सेकंदांनी पुन्हा नकुलनाथ यांच्या चेहऱ्यावर कॅमेरा फोकस होतो, तेव्हा त्यांनी टिळा पुसलेला असल्याचं दिसतं.
दिल्लीतले भाजप नेते ताजिंदरपालसिंग बग्गा (Tajinderpalsingh Bagga) यांनी ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. ‘‘त्यांच्या’ भागात प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी टिळा पुसून टाकला’ अशी कॅप्शन बग्गा यांनी या व्हिडीओला दिली आहे. ट्विटरवरचा हा व्हिडीओ नकुलनाथ यांच्या रॅलीच्या फेसबुक लाइव्हवरून घेण्यात आल्याचं दिसतं. 13 जुलैला रात्री 1.18 वाजता ट्वीट करण्यात आलेल्या या व्हिडिओला आतापर्यंत 5 लाख व्ह्यूज मिळाले आहेत. ‘प्रत्येक काँग्रेस नेत्याला (Congress) आपल्या हिंदुत्वाच्या ओळखीचा तिटकारा आहे. प्रचारादरम्यान कितीही धावाधाव केली, तरी त्यांची ही तिटकाऱ्याची भावना लपत नाही,’ असं मत भाजप नेते वाई सत्या कुमार यांनी व्यक्त केलं आहे. Sitting Work : डेस्क जॉब करणाऱ्यांना जास्त असतो हृदयविकाराचा धोका, तज्ज्ञांनी सुचवले हे उपाय दरम्यान, वाद निर्माण झाल्यानंतर हा व्हिडिओ नकुलनाथ यांच्या फेसबुक अकाउंटवरून हटवण्यात आल्याचं दिसतं, असं ‘टीव्ही नाइन हिंदी’च्या वृत्तात म्हटलं आहे. तसंच, काँग्रेस मीडिया सेलचे इन्चार्ज के. के. मिश्रा यांनी भाजपने हे ट्वीट राजकारण करण्यासाठी केलं असल्याची टीका केली. रॅलीत कोणालाही घाम येतो आणि तो पुसणं ही सर्वसामान्य गोष्ट आहे. त्या गोष्टीचा राजकारणाची पोळी भाजण्यासाठी वापर करणं, यातून भाजपच्या संकुचित मानसिकतेचं दर्शन घडतं, असं मिश्रा यांनी म्हटल्याचं ‘टीव्ही नाइन हिंदी’च्या वृत्तात म्हटलं आहे.