JOIN US
मराठी बातम्या / देश / Video : भाजप मंत्र्याने सर्वांसमोर दाखवलं घोरून, बिबट्याच्या हल्ल्याचा किस्सा ऐकताना पोट धरून हसाल!

Video : भाजप मंत्र्याने सर्वांसमोर दाखवलं घोरून, बिबट्याच्या हल्ल्याचा किस्सा ऐकताना पोट धरून हसाल!

भाजप मंत्र्याने चक्क माध्यमांशी बोलताना घोरण्याचा आवाजही काढून दाखवला.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

भोपाळ, 10 जानेवारी : गेल्या काही दिवसांपासून मध्य प्रदेशचे (Madhya Pradesh News) वनमंत्री वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहेत. इंदूरच्या विजयनगर स्पा सेंटरमध्ये थायलँडच्या 10 मुलींना पकड्यात आले. यादरम्यान 9 ग्राहकांपैकी तिघेजण खंडवाच्या खालवा मंडळाचे भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी आहेत. सर्वांना गुरुवारी छापेमारीदरम्यान सेक्स रॅकेटमध्ये पकडण्यात आलं होतं. हरसूद विधानसभा मतदार संघाचे नेता आणि राज्य सरकारमध्ये वन मंत्री असलेले विजय शाह यांच्या जवळचे होते. या प्रकरणानंतर आरोपींचे विजय शाह (BJP leader Vijay Shah) यांच्यासोबतचे फोटो समोर आले आहेत. मात्र विजय शाह यांनी या प्रकरणात स्पष्टीकरण दिलं आणि गुन्हा केला असल्यास त्यांना शिक्षा होईल आणि कायदा तो देईल असंही सांगितलं. मात्र सध्या विजय शाह यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वनमंत्री या व्हिडीओमध्ये बिबट्या हल्ल्याबद्दल सांगत आहेत. पचमणीमध्ये एका व्यक्तीवर बिबट्याने हल्ला केला होता. वनमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ती व्यक्ती घोरत असल्यामुळे बिबट्याने त्याच्या नाकावर हल्ला केला.

संबंधित बातम्या

विशेष म्हणजे हा किस्सा सांगत असताना वनमंत्री विजय शाह यांनी स्वत: घोरण्याचा आवाज काढून दाखवला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकरी विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या