JOIN US
मराठी बातम्या / देश / Uttarakhand Exit Polls : पहिल्याच एक्झिट पोलमध्ये भाजपला धक्का, ABP C-Voter च्या पोलमध्ये काँग्रेसची मुसंडी

Uttarakhand Exit Polls : पहिल्याच एक्झिट पोलमध्ये भाजपला धक्का, ABP C-Voter च्या पोलमध्ये काँग्रेसची मुसंडी

पाच राज्यांच्या मतदानाचा अखेरचा टप्पा (Assembly Election 2022) पार पडला आहे, त्यानंतर आता एक्झिट पोलचे आकडे यायला सुरूवात झाली आहे. एबीपी न्यूज आणि सी-व्होटरच्या (ABP News C-Voter) एक्झिट पोलनुसार उत्तराखंडमध्ये (Uttarakhand Exit Poll) भाजपला (BJP) धक्का बसणार आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 7 मार्च : पाच राज्यांच्या मतदानाचा अखेरचा टप्पा (Assembly Election 2022)  पार पडला आहे, त्यानंतर आता एक्झिट पोलचे आकडे यायला सुरूवात झाली आहे. एबीपी न्यूज आणि सी-व्होटरच्या (ABP News C-Voter) एक्झिट पोलनुसार उत्तराखंडमध्ये (Uttarakhand Exit Poll) भाजपला (BJP) धक्का बसणार आहे. उत्तराखंडमध्ये काँग्रेस (Congress) सगळ्यात मोठा पक्ष ठरू शकतो. एबीपी आणि सी-व्होटरच्या एक्झिट पोल नुसार भाजपला 26 ते 32, काँग्रेसला 32 ते 38, आप ला 0 ते 2 आणि इतरांना 3 ते 7 जागा मिळण्याचा अंदाज आहे. उत्तराखंडमध्ये 70 जागांसाठी 14 फेब्रुवारीला मतदान झालं होतं. मतदान पूर्ण झाल्यानंतरही इतर चार राज्यांमध्ये निवडणुका असल्यामुळे आयोगाने एक्झिट पोल देण्यावर बंदी घातली होती. 7 मार्चला उत्तर प्रदेशमध्ये शेवटच्या टप्प्याचं मदतान पार पडल्यानंतर एक्झिट पोल घ्यायला निवडणूक आयोगाने परवानगी दिली आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूरमध्ये या पाच राज्यांच्या निवडणुका म्हणजे 2024 लोकसभा निवडणुकीची सेमी फायनल मानली जात आहे. उत्तराखंडमध्ये कोणत्याच पक्षाने मुख्यमंत्रीपदाचा चेहरा दिला नव्हता, तरी भाजपने नेतृत्वाची जबाबदारी मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी तर काँग्रेसने माजी मुख्यमंत्री हरीश रावत आणि आपने अजय कोठियाल यांना दिली होती. 10 मार्चला या पाचही राज्यांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत. 2017 साली भाजपने 70 पैकी 57 जागा जिंकल्या होत्या, तर काँग्रेसला 11 आणि इतर पक्षांना 2 जागा जिंकता आल्या होत्या. एवढ्या मोठ्या प्रमाणावर यश मिळूनही भाजपला उत्तराखंडमध्ये मागच्या वर्षी चार महिन्यात तीनवेळा मुख्यमंत्री बदलावे लागले होते. 4 वर्ष त्रिवेंद्रसिंग रावत उत्तराखंडचे मुख्यमंत्री होते, पण पक्षांतर्गत नाराजीमुळे रावत यांच्याऐवजी तिरथसिंग रावत यांना मुख्यमंत्री केलं. कोरोना व्हायरसमुळे निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकांवर बंदी घातली होती, त्यामुळे तिरथसिंग रावत मुख्यमंत्री झाल्यानंतर पुढच्या 6 महिन्यात त्यांना विधानसभेचं सदस्य होणं शक्य नव्हतं, त्यामुळे तिरथसिंग यांना राजीनामा द्यावा लागला. तिरथसिंग रावत यांच्यानंतर पुष्कर सिंग धामी यांना भाजपने उत्तराखंडचं मुख्यमंत्री केलं. 10 मार्च ते 4 जुलै या 4 महिन्यांच्या काळात भाजपला उत्तराखंडमध्ये 3 मुख्यमंत्री बदलावे लागले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या