JOIN US
मराठी बातम्या / देश / तिरथ सिंह रावत यांच्या विधानानं एकच गोंधळ; अखेर म्हणाले, 'जीन्स वापरण्याला विरोध नाही पण..'

तिरथ सिंह रावत यांच्या विधानानं एकच गोंधळ; अखेर म्हणाले, 'जीन्स वापरण्याला विरोध नाही पण..'

ट्विटरवर RippedJeans हा हॅश्टॅगही जोरदार ट्रेंड होत आहे. मात्र, इतकं सगळं होऊनही अजूनदेखील तिरथ सिंह (Tirath Singh Rawat) आपल्या विधानावर ठाम आहेत.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 19 मार्च : काही दिवसांपूर्वीच उत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदाचा कारभार हाती घेतलेले नवनिर्वाचित मुख्यमंत्री तिरथ सिंह रावत (Tirath Singh Rawat) काही काळातच बरेच चर्चेत आले. आधी पंतप्रधानांची देवासोबत केलेली तुलना आणि नंतर जीन्सबद्दलचं विधान या दोन्ही गोष्टी चर्चेत आल्या. मात्र, जीन्सबद्दल केलेलं विधान त्यांना चांगलंच भोवलं. आजकाल महिला फाटलेल्या जीन्स घालून फिरतात, हे सगळं बरोबर आहे का? हे कसले संस्कार आहेत? असं त्यांनी म्हटलं होतं. यानंतर सोशल मीडियावर कलाकारांसह इतरही अनेकांनी त्यांना ट्रोल करत अशाच जीन्समधील आपले काही फोटो शेअर केले. इतकंच नाही तर ट्विटरवर Ripped Jeans हा हॅश्टॅगही जोरदार ट्रेंड होत आहे. मात्र, इतकं सगळं होऊनही अजूनदेखील तिरथ सिंह आपल्या विधानावर ठाम आहेत. अनेक स्तरांतून झालेल्या टिकेनंतरही आपण आपल्या विधानावर ठाम असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. याबद्दल बोलताना ते म्हणाले, की महिलांच्या जीन्स वापराला माझा विरोध नाही मात्र फाटक्या जीन्स वापरण्याला माझा विरोधच आहे. एका हिंदी वेबसाईटनं याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. काय म्हणाले होते रावत? फाटक्या जीन्सच्या वापरावरून तिरथ सिंह रावत यांनी महिलांच्या संस्कारांबाबत भाष्य केले होते. त्यांनी यावेळी एक अनुभव सांगितला होता. ते असं म्हणाले की, ‘मी एकदा विमानप्रवासात होतो. त्यावेळी एक महिला आपल्या दोन मुलांना घेऊन बसली होती. त्या महिलेनं फाटलेली जीन्स घातलेली होती. यावेळी मी त्यांना विचारलं की कुठे जायचं आहे.? यावेळी महिलेने दिल्लीला जात असल्याचं म्हटलं. तिने अशी देखील माहिती दिली की, तिचे पती जेएनयूमध्ये प्राध्यापक आहे आणि महिला स्वयंसेवी संस्था चालवते’. ते पुढे असं म्हणाले की, ‘माझ्या मनात विचार आला, जी महिला NGO चालवते आणि फाटलेली जीन्स घालते, ती समाजात कोणत्या संस्कृतीचा प्रसार करत असेल लागेल.’ त्यांनी पुढे असं देखील म्हटलं की पाश्चिमात्य संस्कृतीपासून दूर राहावं लागेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या