JOIN US
मराठी बातम्या / देश / उत्तराखंड अपघातस्थळी घेतला जाणार थर्मल स्कॅनिंगसह आणखी एका आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार

उत्तराखंड अपघातस्थळी घेतला जाणार थर्मल स्कॅनिंगसह आणखी एका आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार

ग्लेशियर अपघातात अडकलेल्यांना सुरक्षित बाहेर काढण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

डेहराडून, 10 फेब्रुवारी : उत्तराखंडच्या चमोली (Uttarakhand glacier burst) इथं नुकत्याच झालेल्या भयानक अपघातानंतर (accident) मोठाच विस्कळीतपणा निर्माण झाला आहे. आता तपोवन बोगद्यात (Tapowan tunnel) फसलेल्या जवळपास 30-35 लोकांना वाचवण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत. सर्वच लोक राडारोडा दूर हटवून मजूरांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. अशात पूर्ण प्रयत्न केला जातो आहे, की लवकरात लवकर बोगदा मोकळा केला जाईल. यासाठी एसडीआरएफच्या माध्यमातून ड्रोन (drone) आणि हेलिकॉप्टर (Helicopter) वापरत ब्लॉक टनेलची (block tunnel) सर्जिकल स्कॅनिंगही केली जात आहे. कुठल्याही जागी टनेल अर्थात बोगदा बनवला जातो तेव्हा त्याआधीही तिथल्या जमिनीची भौगोलिक रचना समजून घेण्यासाठी अशाच प्रकारे सर्वेक्षण केलं जातं. कुठेही बोगदा बनवताना रिमोट सेन्सिंगच्या आधारे तिथली जिऑग्राफिकल मॅपिंग केली जाते. यातून जमिनीच्या आतल्या भौगोलिक संरचनेशी संबंधित डाटा उपलब्ध होतो.

यात रिमोट सेन्सिंगद्वारे (remote sensing) बोगद्याची जिऑग्राफिकल मॅपिंग (geographical mapping) केली जाईल. टनलच्या आतमध्ये राडारोड्याशिवाय अजूनही नक्की काय चित्र आहे ते यातून स्पष्ट होऊ शकतं. याशिवाय थर्मल स्कॅनिंग (Thermal scanning) किंवा लेजर स्कॅनिंगच्या माध्यमातून तपोवन ब्लॉक टनेलच्या आत फसलेल्या कर्मचाऱ्यांची अजून जास्त माहितीही एसडीआरएफला मिळू शकते. यात अनेक शास्त्रीय पद्धती वापरून ब्लॉक टनेलच्या आत पोहोचण्याचं काम केलं जात आहे. सोबतच जमिनीच्या आतल्या स्थितीला अधिक नेमकेपणानं समजण्यासाठी ड्रोनच्या माध्यमातून जिओ मॅपिंगद्वारे माहिती मिळवली जाते. यासोबतच जमिनीच्या आत असलेल्या सजीव गोष्टींच्या माहितीसाठी थर्मल स्कॅनिंग केली जाते. मात्र थर्मल स्कॅनिंगचा परीघ खूप कमी असतो. त्यामुळं लेजरच्या माध्यमातून स्कॅनिंग केली जाते. यातून जमिनीच्या खालचीही थर्मल इमेज मिळते. हेही वाचा Glacier Burst : सेनेचे जवान बनले देवदूत, बचावकार्य युद्धपातळीवर सुरू बचावकार्याबाबत डीजीपी अशोक कुमार यांचं म्हणणं आहे, की बोगद्यात सुरुवातीला केवळ राडारोडा येत होता. आता बोल्डर्सही येत आहेत. अशावेळी बोगदा खुला होण्याच्या शक्यता अधिक वाढतात. यासोबतच ड्रिल करून बोगद्याच्या आतली स्थिती पाहण्याचा विचार सुरू आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या