JOIN US
मराठी बातम्या / देश / एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं, उत्तराखंडमधून पहिल्यांदाच समोर आला महाभीषण VIDEO

एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं, उत्तराखंडमधून पहिल्यांदाच समोर आला महाभीषण VIDEO

उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातील जोशीमठ तालुक्यात हिमकडा कोसळल्यामुळे (Uttarakhand Disaster) प्रचंड मोठी हानी झाली. हिमकडा कोसळल्यामुळे नदीला महापूर आला.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

उत्तराखंड, 10 फेब्रुवारी : उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातील जोशीमठ तालुक्यात हिमकडा कोसळल्यामुळे (Uttarakhand Disaster) प्रचंड मोठी हानी झाली. हिमकडा कोसळल्यामुळे नदीला महापूर आला. पाण्याचा प्रवाह एवढा वाढला, की ज्यात अनेक जण बेपत्ता झाल्याची भीती वर्तवली जात आहे. त्यातच आता एक मन विचलित करणारा व्हिडिओ समोर आला आहे. तपोवनच्या NTPC प्रोजेक्टमधला हा व्हिडिओ आहे. आक्राळविक्राळ रूप धारण केलेल्या पाण्यापासून वाचण्यासाठी काही लोक धावपळ करताना या व्हिडिओमध्ये दिसत आहेत, पण पूराच्या पाण्यामध्ये हे सगळे जण वाहून गेले. हा व्हिडिओ रविवारचा असल्याचं सांगितलं जात आहे. 300 किमी प्रती तासाच्या वेगाने हे पाणी वाहत होतं, त्यामुळे उत्तराखंडमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे.

या दुर्घटनेनंतर राज्य आपत्ती निवारण दलाच्या (SDRF) जवानांबरोबरच इंडो-तिबेट पोलीस (ITBP) दलातील जवानही मदतकार्यात सहभागी आहेत. या दुर्घटनेत 170 लोकं बेपत्ता झाली असल्याचं म्हटलं जात आहे. याशिवाय आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. वाडिया इन्स्टिट्यूट ऑफ हिमालय जिऑलॉजी या संस्थेच्या शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे, की उत्तराखंड राज्यातील बहुतांश हिमनद्या अल्पाइन हिमनद्या (Glacier) आहेत. या ग्लेशियर्स स्नो अॅव्हलाँच म्हणजेच हिमकडा घसरण्याच्या आणि तुटण्याच्या, स्खलन होण्याच्या दृष्टीने खूप धोकादायक आहेत. अधिक थंडीच्या मोसमात पर्वतीय क्षेत्रात होणारा पाऊस आणि हिमवर्षाव यांमुळे अल्पाइन ग्लेशियरवर काही लाख टन एवढा बर्फ साठतो. त्यामुळे हिमनदीत स्खलन होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात निर्माण होतो. …म्हणून उत्तराखंडवर आला महाप्रलय; वैज्ञानिकांनी व्यक्त केली शंका उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात नंदादेवी ग्लेशियरच्या एका भागाचे स्खलन झाल्यामुळे आलेल्या मोठ्या पुराच्या कारणांचा अभ्यास करण्यासाठी त्या विषयातील तज्ज्ञांच्या दोन टीम्स जोशीमठ-तपोवन येथे जातील. संस्थेचे संचालक कलाचंद सैन यांनी ही माहिती दिली. या तज्ज्ञांना ग्लेशियॉलॉजिस्ट असं म्हणतात. एका टीममध्ये दोन, तर दुसऱ्या टीममध्ये तीन सदस्य आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या