लखनऊ, 4 मे: देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोनामुळे (Corona) बिकट स्थिती निर्माण झाली आहे. रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने ऑक्सिजन, व्हेन्टिलेटर, बेड्स आणि औषधांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा भासत आहेत. या महामारीच्या पार्श्वभूमीवर प्रेरणा देणारे, कोरोनाशी दोन हात करताना जिंकलेल्या लोकांचे अनुभव समोर येत आहेत. उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) ही घटना अशीच म्हणावी लागेल. डायलिसीसची गरज असलेल्या आईला घरापासून 240 किलोमीटर अंतराचा प्रवास करत बहिण-भावाने रुग्णालयात (Hospital) आणले. परंतु, आईला (Mother) कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर रुग्णालयात जागा मिळाली नाही म्हणून रुग्णालयातील पार्किंगमध्ये गाडीतच 10 दिवस त्यांनी आपल्या आईला ठेवून उपचार केले. 10 दिवसांनंतर त्यांची आई बरी झाली आणि तिला डिस्चार्ज (Discharge) देण्यात आला. उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) लखीमपुरी येथील पायल (वय 25), तिचा भाऊ आकाश सिंग (वय 23) आणि आई पारुल (वय 45) हे तिघे 20 एप्रिलला लखनऊ येथे डायलिसिस (Dialysis) उपचारासाठी गेले होते. उपचारानंतर लखीमपूरला परतत असताना त्यांच्या आईला ताप आला. रुग्णालयाने आरटीपीसीआर टेस्ट (RT-PCR Test) करण्यास सांगितले. परंतु, कोरोना संशयित रुग्ण असल्याने आणि त्यांच्यासमोर अन्य काही पर्याय नसल्याने त्यांना रुग्णालयाच्या पार्किंगमध्ये गाडीतच रात्र काढावी लागली. या बहिण-भावाने त्या दिवशी स्थानिक विक्रेत्यांकडून अन्न पदार्थ खरेदी करत कसेतरी मॅनेज केले. दुसऱ्या दिवशी त्यांच्या आईचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला. त्यामुळे रुग्णालयाने डायलिसिस ट्रिटमेंट (Treatment) देण्यास नकार दिला. त्यानंतर या दोघांनी खासगी रुग्णालयांमध्ये या ट्रिटमेंटबाबत चौकशी केली. परंतु, त्यांच्या आईची ऑक्सिजन पातळी (Oxygen Level) कमी होऊ लागल्याने रुग्णालयांनी ट्रीटमेंट देण्यास नकार दिल्याचे टाइम्स ऑफ इंडिया च्या वृत्तात म्हटलं आहे. वाचा: राज्यातील कोरोनाचा विळखा सैल होतोय; गेल्या चार दिवसांत सव्वा 2 लाख रुग्णांची करोनावर मात याबाबत या बहिण-भावाने सांगितले की, त्यावेळी आम्ही अनेक शोध घेतला पण कोणत्याही रुग्णालयात ऑक्सिजन बेड उपलब्ध झाला नाही. मात्र 5 लहान ऑक्सिजन कॅन मिळवण्यात आम्हाला यश आले. हे सर्व 22 एप्रिलला घडले. आईची प्रकृती सुधारेल या आशेने आम्ही कारमध्येच बसून होतो. आईची ऑक्सिजन पातळी सुधारली तेव्हा तिला डायलिसिस ट्रिटमेंट देण्यात आली. ऑक्सिजन पातळी सुधारण्यासाठी आम्ही आईला प्रोनिंग ट्रिटमेंट दिली. ती रात्रही आम्ही कारमध्येच काढली. 23 एप्रिलला आमचे वडील भाडे तत्वावरील कारमध्ये ऑक्सिजन सिलिंडर घेऊन आले. सुरक्षेच्या कारणास्तव आम्ही वडिलांना परत पाठवून दिले आणि आईला कारमध्येच ऑक्सिजन सपोर्ट सुरु केला. 23 एप्रिलला देखील आम्हाला कोठेही बेड उपलब्ध होऊ शकला नाही. त्यामुळे आम्हाला गाडीतच मुक्काम करावा लागला. अखेरीस 24 एप्रिलला राम मनोहर लोहिया वैद्यकीय विज्ञान संस्थेत (RMLIMS) या भावंडांना बेड उपलब्ध असल्याचे समजले. त्यानंतर त्यांनी तेथे आईला भरती केले. उपचारानंतर 30 एप्रिलला त्यांच्या आईला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. मात्र या दरम्यान आकाशला कोरोनाची सौम्य लक्षणे जाणवू लागली. यावेळी बहिण पायल हिने संसर्ग आपल्याला संसर्ग होऊ नये यासाठी मास्क आणि हॅण्डग्लोजचा वापर सुरु केला. त्यानंतर आकाशवर उपचार सुरु झाले. आकाश कारमध्येच आयसोलेट (Isolate) झाला आणि सर्व जबाबदारी पायलवर आली. या कालावधीत आमच्याकडे फक्त 12 हजार रुपये होते. नंतर वडिलांनी ऑनलाईन पैसे ट्रान्सफर केले परंतु 10 दिवस आम्हाला गाडीतच राहावे लागले. हे 10 दिवस त्यांना सार्वजनिक स्वच्छतागृहाचा वापर करावा लागला. तसेच सातत्याने गाडी सॅनिटाईज्ड करावी लागली.