लखनऊ, 26 फेब्रुवारी: नेहमी चोराला पकडून चोप देणाऱ्या पोलिसांना आपण अनेक वेळा पाहिलं असेल, पण चोरी केल्याने पोलिसाला चोप दिल्याचा अजब नजारा सोशल मीडियात व्हायरल होताना दिसत आहे. एका पोलिसाने वी मार्ट मॉलमध्ये चोरी केल्याची घटना समोर आली आहे. आरोपी पोलिसाने मॉलमधील तीन टीशर्ट आपल्या पोलीस वर्दीच्या आतमध्ये घालून जात होता. त्यावेळी टीशर्टला लावलेल्या बारकोडमुळे गेटवरील सायरन वाजू लागला. त्यामुळे मॉलचे कर्मचारी धावत आले आणि आरोपी पोलिसाला पकडलं आहे. त्यानंतर आरोपी पोलिसाला मॉलच्या कर्मचाऱ्यांनी चांगलाच चोप दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी पोलीस उत्तर प्रदेशातील लखनऊ येथील हुसेनगंज येथील एका वी मार्ट मॉलमध्ये गेला होता. यावेळी संबंधित आरोपी पोलिसाने या मॉलमधील तीन टी-शर्ट आपल्या पोलीस खाकीच्या आतून परिधान करून चोरी करून घेवून जात होता. पण टी शर्टवर लावलेल्या बारकोडमध्ये गेटवरील सायरन वाजू लागला. त्यानंतर गेटवरील कर्मचाऱ्यांनी संबंधित पोलिसाला पकडलं. शिवाय त्याला चांगलाच चोप दिला आहे.
या पोलिस कर्मचाऱ्याला चोप दिल्याच्या व्हिडिओ वेगात व्हायरल झाला आहे. हा चोरी केल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलीस आयुक्त डी के ठाकूर यांनी संबंधित पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित केलं असून चौकशीचे आदेश दिले आहेत. हुसेनगंजचे प्रभारी निरिक्षक दिनेश कुमार बिष्ट यांनी सांगितलं की, आरोपी आदेश कुमार पोलीस लाइन येथे सेवेवर होता. यावेळी त्याने हुसेनगंज येथील जवळच्या एका चौकात असणाऱ्या वी मार्ट मॉलमध्ये चोरी केली आहे. हे ही वाचा- भारतीय महिलेनं सिंगापूरमध्ये मोलकरणीला छळ करून मारलं; आता आयुष्यभर फोडणार खडी मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी पोलीस कर्मचाऱ्याला रंगेहाथ पकडल्यानंतरही संबंधित आरोपीने मॉलच्या कर्मचाऱ्यांशी अरेरावी करायला सुरुवात केली. त्यानंतर मॉल कर्मचाऱ्यांनी आरोपीची चांगलीच धुलाई केली आहे. तसेच या घटनेचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर देखील व्हायरल केला आहे. याप्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर, हुसेनगंजचे पोलीस निरिक्षक दिनेश बिष्ट घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी संबंधित अधिकाऱ्याला तीनही टी शर्टची किंमत द्यायला लावली आहे. आणि प्रकरण मिटवलं. पण व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आरोपी पोलिसावर कारवाई करण्यात आली आहे.