उत्तर प्रदेश, 30 जून: उत्तर प्रदेश (Uttar Pradesh)ची राजधानी लखनऊ (Lucknow) मध्ये सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदार पूनावाला (Adar poonawalla) यांच्या विरोधात न्यायालयात खटल्याचा अर्ज दाखल करण्यात आला. कोरोना व्हॅक्सिन कोव्हिशील्ड (Covishield) घेऊनही शरीरात अॅटीबॉडीज तयार न झाल्यानं हा अर्ज दाखल करण्यात आला आहे. या अर्जावर न्यायालयात संबंधित पोलीस स्टेशनमधून अहवाल घेतला आहे. यावर पुढील सुनावणी 2 जुलै रोजी करण्याचे आदेश देण्यात आलेत. वकिल प्रताप चंद्र यांनी 8 एप्रिलला गोविंद हॉस्पिटलमध्ये कोव्हिशील्ड व्हॅक्सिनचा पहिला डोस घेतला होता. 28 एप्रिलला दुसरा डोस होता. मात्र व्हॅक्सिन घेतल्यानंतरही त्यांची प्रकृती ठिक नव्हती. त्यानंतर त्यांनी 25 मे रोजी अॅटीबॉडीज टेस्ट केली. मात्र त्यांच्या शरीरात अॅटीबॉडीज तयार झाले नाही. सामान्य प्लेटलेटही कमी झाले. ज्यामुळे त्यांना संक्रमणाचा धोका वाढला. त्यामुळे या प्रकरणी अदार पूनावाला यांच्या विरोधात प्रताप चंद्र यांनी न्यायालयात खटला दाखल केला आहे. हेही वाचा- महाराष्ट्रात का वाढताहेत कोरोना रुग्ण?; डेल्टा + व्हेरिएंटचा कसा होतोय परिणाम?, जाणून घ्या वकिल प्रताप चंद्र यांनी एफआयआर दाखल करण्यासाठी अदार पूनावाला यांच्यासहित 7 लोकांची नावं न्यायालयात दिली आहेत. या अर्जात केंद्रीय औषध मानक नियंत्रण, आयसीएमआरचे महासंचालक, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाचे सहसचिव, राष्ट्रीय आरोग्य मिशन उत्तर प्रदेशचे संचालक, गोविंद हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर लखनऊ यांचे संचालक यांनाही विरोधी पक्ष करण्यात आले आहेत. वकिलानं या सर्वांविरोधात न्यायालयात फसवणूक आणि हत्येच्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे आदेश द्यावे अशी मागणी केली आहे. न्यायालयानं या प्रकरणी पोलीस स्टेशनमधून अहवाल मागवला असून पुढील सुनावणी 2 जुलै रोजी होणार आहे.