उत्तर प्रदेश, 01 जून: उत्तर प्रदेशमधील फर्रुखाबादमध्ये (Farrukhabad, Uttar Pradesh) नवाबगंजच्या विद्युत विभागाच्या कार्यालयातील (Nawabganj Electricity Department office) एक फोटो सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. हा फोटो दहशतवादी ओसामा बिन लादेनचा (Terrorist Osama Bin Laden) आहे. कार्यालयात लावण्यात आलेल्या फोटोखाली जे लिहिलं आहे ते वाचून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल. फोटोच्या माध्यमातून ओसामा बिन लादेनचे जगातील सर्वोत्कृष्ट कनिष्ठ अभियंता (जेई) असे वर्णन करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. विशेष म्हणजे एसडीओ नवाबगंज यांच्याशी याबाबत बोलले असता त्यांनी हा फोटो स्वत: कार्यालयात लावल्याचे मान्य केले. त्याचबरोबर कोणीही कोणालाही आदर्श मानू शकतो, असेही सांगण्यात आले. मात्र, हा फोटो इंटरनेट मीडियावर व्हायरल झाल्यानंतर कार्यालयातून काढून घेण्यात आला आहे. जगात Monkeypox च्या वाढत्या धोक्यानंतर भारत सरकारचा Alert मोड ऑन नवाबगंजमध्ये वीज विभागाच्या उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयाला लागून असलेल्या भिंतीवर कनिष्ठ अभियंता जुनेद आलम अन्सारी आणि अनिल कुमार गौतम यांच्यासह उपविभागीय अधिकारी रवींद्र प्रकाश गौतम यांच्या फोटोला लागून ओसामा बिन लादेनचा फोटो लावण्यात आला होता. वेटिंग रूमच्या भिंतीवर दहशतवादी ओसामा बिन लादेनचा फोटो पाहून पॉवर हाऊसमध्ये गेलेले लोक आश्चर्यचकित झाले. दहशतवादी ओसामा बिन लादेनच्या फोटोवर जगातील सर्वोत्तम कनिष्ठ अभियंता, तसेच उपविभागीय अधिकाऱ्याचे नाव लिहिले होते. काही व्यक्तीने दहशतवादी ओसामा बिन लादेनचा भिंतीवरचा फोटो आणि व्हिडिओ इंटरनेट मीडियावर व्हायरल केला. व्हायरल झालेला फोटो आणि व्हिडिओ पाहून भारतीय शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रमोद मिश्रा मोनू यांनी या प्रकरणाची माहिती जिल्हाधिकाऱ्यांपासून विद्युत विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. ही बाब वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास येताच कर्मचाऱ्यांनी फोटो काढून टाकला. सरकारी कार्यालयात दहशतवाद्याचा फोटो लावल्याची चर्चा लोकांमध्ये होती. अधीक्षक अभियंता एस.के.श्रीवास्तव यांनी सांगितलं की, या संपूर्ण प्रकरणाचा कायमगंजच्या कार्यकारी अभियंत्याकडून अहवाल मागवण्यात आला आहे. या संदर्भात व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य अभियंता यांना कारवाईसाठी पत्र पाठविण्यात येत आहे. एसडीओ म्हणाले… उपविभागीय अधिकारी रवींद्र प्रकाश गौतम म्हणाले की, कोणीही कोणालाही आदर्श मानू शकतो. होय, मी मान्य करतो की तो जगातील सर्वोत्तम कनिष्ठ अभियंता होता. फोटो हटवण्याच्या प्रश्नावर ते म्हणाले की, फोटो काढून टाकल्यास तो पुन्हा वापरला जाईल, त्यामुळे त्याच्या अमर्याद प्रती आहेत.