JOIN US
मराठी बातम्या / देश / Amit Shah : भाषण सुरू झालं अन् अजानचा आवाज ऐकू आला, पाहा अमित शहांनी काय केलं?

Amit Shah : भाषण सुरू झालं अन् अजानचा आवाज ऐकू आला, पाहा अमित शहांनी काय केलं?

येथे रॅली काढण्याची योजना आखली होती, तेव्हा काही लोकांनी बारामुल्लाचा कार्यक्रम ऐकण्यासाठी येथे कोण येणार अशी टीका केली होती.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

बारामुल्ला, 5 ऑक्टोबर : जम्मू आणि काश्मिरमधील बारामुल्ला येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सभेदरम्यान एक घटना घडली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आज बुधवारी बारामुल्ला शहरात एका जाहीर सभेला संबोधित करत होते. मात्र, यावेळी त्यांचे भाषण सुरू होते. अमित शहा यांच्या भाषणादरम्यान मागील असताना मागील मशिदीत अजान सुरू झाली. यावेळी अजान ऐकालया आल्यावर शाह यांनी त्यांचे भाषण मध्येच थांबवले. आणि यानंतर अजान संपल्यानंतर शाह यांनी पुन्हा भाषण सुरू केले. यावेळी काय म्हणाले अमित शहा - आपल्या भाषणात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, मोदींच्या मॉडेलमध्ये आणि गुपकरांच्या मॉडेलमध्ये खूप फरक आहे. मतदार यादी तयार करण्याचे काम पूर्ण होताच जम्मू-काश्मीरमध्ये पूर्ण पारदर्शकतेने निवडणुका होतील, अशी माहिती त्यांनी दिली. ते म्हणाले. काही दिवसांपूर्वी मेहबुबा मुफ्ती यांचे एक ट्विट वाचण्यात आले होते की, तुम्ही गृहमंत्री येत असाल तर काश्मीरला काय दिले याचा हिशेब द्या.जम्मू-काश्मीरला आपण काय दिले, याचा हिशेब मी देतो, पण जम्मू-काश्मीरमध्ये तीन घराण्यांनी अनेक दशके राज्य केले, त्यांनी काय दिले, त्याचाही हिशेब त्यांना द्यावा लागेल, असे ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, येथे रॅली काढण्याची योजना आखली होती, तेव्हा काही लोकांनी बारामुल्लाचा कार्यक्रम ऐकण्यासाठी येथे कोण येणार अशी टीका केली होती. त्या लोकांना मला सांगायचे आहे की, या कार्यक्रमात काश्मीरच्या या सुंदर खोऱ्यातील हजारो लोक विकासाची कहाणी ऐकण्यासाठी आणि मोदीजींना पाठिंबा देण्यासाठी उपस्थित आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या