नवी दिल्ली, 7 जुलै : नरेंद्र मोदी यांच्या सरकारमधील (Narendra Modi Government) मंत्रिमंडळाचा विस्तार (Cabinet expansion) होत आहे. या मंत्रिमंडळात अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. मोदी सरकार 2.0 (Modi Government 2.0) मधील हा पहिला मंत्रिमंडळ विस्तार असून यामध्ये महाराष्ट्रातील चार नव्या चेहऱ्यांचा समावेश होणार आहे. ज्यामध्ये नारायण राणे (Narayan Rane), कपिल पाटील (Kapil Patil), भारती पवार (Bharti Pawar) आणि भागवत कराड (Bhagwat Karad) यांच्या नावाचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मोदींच्या मंत्रिमंडळात एकूण 43 जणांना संधी देण्यात येणार आहे. पाहूयात या 43 जणांमध्ये कुठल्या नेत्यांचा समावेश आहे. न्यूज एजन्सी एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात एकूण 43 जणांचा समावेश करण्यात येणार आहे. हे सर्वजण आज होणाऱ्या शपथविधी सोहळ्यात मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. यामध्ये काही नेते असे आहेत ज्यांच्याकडे राज्यमंत्रिपद होते आणि त्यांना आता कॅबिनेट मंत्रिपद देण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे. हे नेते कॅबिनेट विस्तारासाठी दिल्लीत दाखल नारायण राणे कपिल पाटील डॉ भारती पवार भागवत कराड ज्योतिरादित्य सिंधिया सर्बानंद सोनोवाल राजीनाम्याच्या चर्चेनंतर रावसाहेब दानवे यांची पहिली मोठी प्रतिक्रिया
पशुपती पारस भूपेंद्र यादव अनुराग ठाकूर मीनाक्षी लेखी
शोभा करंदजले विरेंद्र कुमार रामचंद्र प्रसाद सिंग किरेन रिजीजू राज कुमार सिंग मनसुख मांडविया