JOIN US
मराठी बातम्या / देश / मेडिकल कॉलेजमध्ये सर्जरी करून तरुणांची झाली तरुणी; 4 तास सुरू होती सर्जरी!

मेडिकल कॉलेजमध्ये सर्जरी करून तरुणांची झाली तरुणी; 4 तास सुरू होती सर्जरी!

यातील एक मुलगी हिंदू आणि दुसरी मुस्लीम. त्यांच्या कुटुंबीयांना हा प्रकार समजल्यावर त्यांनी वैद्यकीय महाविद्यालयाशी संपर्क साधला

जाहिरात

प्रातिनिधिक फोटो

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

लखनऊ, 11 जून : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh News) मेरठमध्ये एलएलआरएम मेडिकल कॉलेजच्या सुपर स्पेशालिटी ब्लॉकमध्ये वरिष्ठ सर्जन डॉ सुधीर राठी आणि त्यांच्या टीमने तरुणांची सर्जरी करून त्यांना मुलगी बनवलं आहे. डॉ. राठीने दावा केला आहे की, पश्चिमी उत्तर प्रदेशाच्या मेडिकल कॉलेजमध्ये पहिल्यांदा नव्या पद्धतीने पुरुषाची महिला होण्यासाठी सर्जरी करण्यात आली आहे. ही सर्जरी तब्बल 4 तास सुरू होती. यापैकी एक मुजफ्फरनगर जिल्ह्याचा तर दुसरा बिजनौर जिल्ह्याचा आहे. एकाला रुग्णालयातून सोडण्यात आलं आहे. तर दुसरा अद्याप रुग्णालयात भरती आहे. यातील एक 18 तर दुसरा 24 वर्षांचा आहे. सर्जरीसाठी मोठ्या आतड्याचा उपयोग नव्या योनीसाठी करण्यात आला आहे. या प्रक्रियेला सिग्मॉइड योनीनोप्लास्टी म्हणतात. एक मुलगी हिंदू आणि दुसरी मुस्लीम. त्यांच्या कुटुंबीयांना हा प्रकार समजल्यावर त्यांनी वैद्यकीय महाविद्यालयाशी संपर्क साधला आणि त्यानंतर प्रशासनाच्या परवानगीची प्रक्रिया पूर्ण करून त्यांनी व त्यांच्या टीमने ही शस्त्रक्रिया केली. …मात्र मुल होऊ शकणार नाही… डॉ. राठींनी सांगितलं की, पुरुषाची स्त्री झाल्यानंतर हे लग्न करू शकतात. मात्र त्यांना मुल होऊ शकत नाही. मुलींमध्ये एक्सएक्स क्रोमोझोम असतात. तर मुलींमध्ये एक्सवाय क्रोमोझोम. यांच्यामध्ये एक्सएक्स होते. ज्यामुळे त्यांच्यात मुलींची लक्षण दिसत होती. त्यांची हार्मोनल औषधं आणि मनोचिकित्सकांकडून कौन्सिलिंग करण्यात आली. जिल्हा रुग्णालयाचे मानसोपचार तज्ज्ञ डॉ.कमलेंद्र किशोर सांगतात की, बहुतांश प्रकरणे समाजात मान्यतेची असतात. ज्याला जसं जगायचं आहे, तसं तो जगू शकतो. त्यामुळे अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया केल्या जातात. याशिवाय ज्यांना काही हार्मोनल प्रॉब्लेम्स असतात, ज्यामुळे लोक असं करतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या