गुजरातच्या कच्छ बंदरावर MVs Aviator आणि Atlantic Grace या दोन महाकाय जहाजांची 26 नोव्हेंबरच्या रात्री समोरासमोर जोरदार टक्कर झाली आहे. त्यामुळं भारतीय तटरक्षक दलाने तातडीनं मदत व बचाव कार्य सुरू केल्यामुळं कोणताही हानी या अपघातात झालेली नाही. पाहा Photos
कच्छच्या किनाऱ्यावर शुक्रवारी रात्री दोन जहाजांमध्ये समोरासमोर टक्कर झाली आहे. याची माहिती संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्यानं शनिवारी दिली आहे. या अपघातात कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झालेली नाही.
ANI ने दिलेल्या माहितीनुसार हा अपघात MVs Aviator आणि Atlantic Grace या जहाजांममध्ये झाला. सुरक्षा यंत्रणांनी दाखवलेल्या तत्परतेमुळं संभाव्य हानी टळली आहे.
एका दुसऱ्या घटनेत तमिलनाडुच्या चेन्नईमध्ये सुट्टी घालवण्यासाठी आलेल्या एका नौदल अधिकाऱ्याचा कोवलम समुद्र किनाऱ्यावर बुडून मृत्यू झाला आहे. या अधिकाऱ्याचा मृतदेह हा 5 किलोमीटरपर्यंत समूद्रात वाहून गेला होता. त्यानंतर त्याला केलाम्बक्कममधून किनाऱ्यावरून बाहेर काढण्यात आलं.
डिफेन्स खात्याकडून जारी करण्यात आलेल्या एका प्रेस रिलीजनुसार भारतीय नौदलाचे लेफ्टनंट कमांडर जे. आर. सुरेश हे 25 नोव्हेंबर 2021 ला चेन्नईतील कोवलम समुद्र किनाऱ्यावर बुडाले होते. ते आपल्या कुटुंबासोबत सुट्टीसाठी आले होते. असं प्रेस रिलीजमध्ये स्पष्ट करण्यात आलेलं आहे.
दरम्यान आता Submarine INS वेला ला गुरूवारी देशाच्या सेवेत सामावून घेण्यात आलं आहे. त्यासंदर्भात बोलताना नौदल प्रमुख एडमिरल करमबीर सिंह यांनी म्हटलंय की देशातील Submarine चांगल्या आणि मजबूत करण्यावर आम्ही भर देत असून आता देशाच्या सेवेत सादर करण्यात आलेली Submarine INS वेला ही चौथी पाणुडी आहे.