देशातील व्यापारी आणि संबंधित संस्थांनी 26 फेब्रुवारी रोजी भारत बंदची घोषणा केल्यानुसार देशभरात अनेक ठिकाणी कडकडीत बंद पाळण्यात आला. GST यंत्रणेची अंमलबजावणी सुलभ व्हावी, अशी त्यांची मागणी आहे. यासाठी अखिल भारतीय व्यापारी महासंघाने (CAIT) भारत बंद पुकारला आहे. या बंदला देशभरातून संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे
ओडिशाच्या भुवनेश्वर येथून भारत बंदच काही फोटो समोर आले आहेत. इथे शहरातील रस्त्यांवर शांतता आहे. संघटनांच्या वतीने असं सांगितलं गेलं आहे की देशभरातील सर्व बाजारपेठा बंद राहतील आणि सर्व राज्यांच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये निदर्शन करण्यात येतील. सर्व राज्यस्तरीय परिवहन संघटनांनी भारत सरकारने सुरू केलेल्या नवीन ई-वे बिल कायद्यांविरूद्ध कॅटला पाठिंबा दर्शवला आहे. (Pic- ANI)
परिवहन क्षेत्राव्यतिरिक्त व्यापारी संघटनांनी सुद्धा मोठया संख्येने भारत बंदला आपला पाठिंबा दर्शवला आहे. यामध्ये ऑल इंडिया एफएमसीजी डिस्ट्रिब्यूटर्स फेडरेशन, फेडरेशन ऑफ अल्युमिनियम भांडी उत्पादक आणि व्यापारी संघटना, उत्तर भारत स्पाइस ट्रेडर्स असोसिएशन, अखिल भारतीय महिला उद्योजक संघटना, ऑल इंडिया संगणक डीलर्स असोसिएशन, ऑल इंडिया कॉस्मेटिक मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचा यांनी सहभाग घेतला आहे. (Pic- ANI)
भारत बंदला संयुक्त किसान मोर्चानेही आपला पाठिंबा दर्शवला आहे. किसान विधेयकाचा निषेध करत संयुक्त किसान मोर्चाने सर्व शेतकर्यांना ट्रान्सपोर्टर्स आणि कामगार संघटनांकडून आयोजित भारत बंदमध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. (Pic- AP)
कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कॅट) ने देशव्यापी बंदची हाक दिली आहे. कॅटचा दावा आहे की 40,000 हून अधिक व्यावसायिक संस्थांचे आठ कोटी व्यापारी भारत बंद मध्ये सहभागी होतील. त्याचवेळी काही इतर व्यापारी संघटनांनी ते बंदला पाठिंबा देत नसल्याचं सांगितलं आहे. (Pic- ANI)
GST दुरुस्तीचा निषेध म्हणून सर्व राज्यांतील 1,500 मोठ्या आणि लहान संघटना आंदोलन करणार असल्याचं कॅटचे सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांनी म्हटलं आहे. ते म्हणाले की, औषधाची दुकाने, दूध, भाजीपाला दुकाने यासारख्या अत्यावश्यक सेवा बंदमध्ये सहभागी नसतील. (Pic- ANI)
पुण्यात सुद्धा या बंदला उस्फुर्त प्रतिसाद पहायला मिळाला. पुणे मार्केट यार्डातील भुसार दुकानदारांनी कडकडीत बंद पाळला. देशभरातील 40 हजार व्यापारी संघटना आजच्या आंदोलनात सहभागी झाल्यात. GST तील जाचक अटी रद्द कराव्यात, यासाठी हा बंद पुकारण्यात आलाय