JOIN US
मराठी बातम्या / देश / Tiranga Flag Rules: 'हर घर तिरंगा'! स्वातंत्र्यदिनाच्या नियमात मोठा बदल, आता रात्रंदिवस फडकावता येणार तिरंगा

Tiranga Flag Rules: 'हर घर तिरंगा'! स्वातंत्र्यदिनाच्या नियमात मोठा बदल, आता रात्रंदिवस फडकावता येणार तिरंगा

Tiranga Flag Rules: आता नव्या नियमानुसार नागरिकांना आपल्या घरावर दिवस-रात्र तिरंगा फडकवता येणार आहे. पूर्वी ध्वज फक्त सूर्योदय ते सूर्यास्तापर्यंत फडकवता येत होता.

जाहिरात

Tiranga Flag Rules: 'हर घर तिरंगा'! स्वातंत्र्यदिनानिमित्त नियमात मोठा बदल, आता रात्रंदिवस फडकावता येणार तिरंगा

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 23 जुलै: सरकारनं स्वातंत्र्य दिनापूर्वी ‘हर घर तिरंगा’ (Har Ghar Tiranga) उत्सवासंदर्भात नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. आता तुम्ही तुमच्या घरी दिवसरात्र तिरंगा फडकवू शकता. आतापर्यंत नागरिकांना सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत ध्वज फडकवण्याची परवानगी होती. केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी 20 जुलै रोजी सर्व सचिवांना पत्र लिहून या नवीन नियमाची माहिती दिली आहे. हा नियम लागू होणार आहे. पत्रात म्हटलं आहे की, भारतीय ध्वज संहिता 2002 (flag code of india) मध्ये आणखी सुधारणा करण्यात आली आहे. जेथे ध्वज कोणत्याही नागरिकाच्या निवासस्थानी फडकवता येईल आणि तो रात्रंदिवस फडकवता येईल. पूर्वी असा नियम होता की कोणत्याही ऋतूमध्ये ध्वज फडकवायचा असेल तर तो फक्त सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतच फडकवावा. गृहसचिवांनी पत्रात असंही म्हटलं आहे की, या नियमाचा उद्देश स्वातंत्र्य दिनानिमित्त ‘हर घर तिरंगा’ सोहळ्याचा एक भाग म्हणून नागरिकांना त्यांच्या घरावर राष्ट्रध्वज फडकवण्यासाठी प्रोत्साहित करणं आहे. हेही वाचा:  Cibil Score : चांगला पगार असूनही बँकेनं कर्ज नाकारलं? ’हे’ एक काम मिळवून देईल लोन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं की, “यावर्षी आझादीचा अमृत महोत्सव साजरा करत असताना, हर घर तिरंगा आंदोलनाला बळ देऊया. 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान तिरंगा फडकावा. या चळवळीमुळे राष्ट्रध्वजाशी आपला संबंध अधिक दृढ होईल. 13 ऑगस्ट रोजी सुमारे 30 कोटी घरांमध्ये राष्ट्रध्वज फडकवला जाईल, अशी सरकारची अपेक्षा आहे. यापूर्वी 2009 मध्ये उद्योगपती नवीन जिंदाल यांनी सरकारला निवेदन दिल्यानंतर सरकारनं तिरंगा झेंडा विविध ठिकाणी रात्रंदिवस फडकवता येईल, अशी परवानगी दिली होती. मात्र, नुकत्याच झालेल्या हालचालींमुळे सामान्य नागरिक रात्रंदिवस आपल्या घरात तिरंगा फडकवू शकतात. भारतीय ध्वज संहिता, 2002, याआधी 30 डिसेंबर 2021 च्या आदेशानुसार सुधारित करण्यात आली होती आणि पॉलिस्टर किंवा मशीननं बनवलेल्या ध्वजांना परवानगी दिली होती. आता राष्ट्रध्वज हाताने कातलेल्या आणि हाताने विणलेल्या किंवा मशीनने बनवलेल्या कापूस, पॉलिस्टर, लोकर, रेशीम आणि खादीच्या बंटिंगपासून बनवला जाईल. या पत्रात म्हटलं आहे की, “तिरंगा खराब झालेल्या स्थितीत फडकावू नये, तो आदराने आणि तिरंगा फडकवण्याच्या सर्व नियमांसह फडकावा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या